HOME   लातूर न्यूज

धनगर समाजाचा पक्षविरहीत मेळावा

सरकारने धनगर समाजाची फसवणूक केल्याचा आरोप


धनगर समाजाचा पक्षविरहीत मेळावा

लातूर: २७ जानेवारी रोजी धनगर समाजाचा पक्षविरहीत मेळावा आयोजित करण्यात आला आहे. सरकार आल्यावर धनगर समाजाला एसटी संवर्गातून आरक्षण देऊ असे आश्वासन देण्य़ात आले होते. त्यावर विश्वास ठेऊन धनगर समाजाने मतदान केले भाजपाचे सरकारही आले पण आरक्षणाच्या मुद्द्यावर साडेचार वर्षात कसलाही विचार झाला नाही. सरकारने या समाजाची फसवणूक केली याचा संताप या समाजात आहे. ही बाब लक्षात घेऊन महाराष्ट्रभर धनगर समाजाच्या मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे. लातुरचा मेळावा २७ जानेवारी रोजी आंबेडकर पार्क येथे होणार आहे.
मेळाव्याचे उदघाटन अण्णाराव पाटील करणार असून उत्तमराव जानकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. धनगर समाजातील गट-तट आणि पक्षभेद बाजुला ठेवून हे समाज बांधव एकत्र येतील असे संयोजकांनी सांगितले.


Comments

Top