HOME   लातूर न्यूज

गातेगावात तूती लागवड व रेशीम कीड संगोपन

माजी मंञी दिलीपरावजी देशमुख यांनी केली प्रकल्पाची पाहणी


गातेगावात तूती लागवड व रेशीम कीड संगोपन

लातूर: लातूर जिल्हा मध्यवर्ती बॅकेच्या वतीने बिनव्याजी स्वरूपात अर्थसहाय्य पुरवून ऊभारण्यात आलेल्या गातेगाव येथील शेतकरी रामेश्वर माळी यांच्या शेतातील तूती लागवड व रेशीम कीड संगोपन प्रकल्पाची पाहणी राज्याचे माजी मंञी दिलीपरावजी देशमुख यांनी केली. यावेळी आ.ञ्यंबक भिसे, जिल्हा बॅंकेचे चेअरमन श्रीपतराव काकडे, व्हा.चेअरमन पृथ्वीराज सिरसाट, संचालक नाथसिंह देशमुख, मांजरा कारखान्याचे व्हा. चेअरमन श्रीशैल ऊटगे, जागृती कारखान्याचे व्हा.चेअरमन लक्ष्मण मोरे, धनंजय देशमुख, पं. स. उपसभापती दत्ता शिंदे, संभाजी सूळ, संभाजी रेड्डी, सुपर्ण जगताप, बालाजी पांढरे, सतीश पाटील, रवींद्र काळे, जिल्हा बॅकेचे कार्यकारी संचालक एच. जे. जाधव आदींची ऊपस्थीती होती.
कष्ट करत आत्मसन्मानाने जगू पाहूणा-या शेतकरी बांधवांना मदत करण्यासाठी लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅक सक्षमपणे ऊभी राहत आलेली आहे. त्याचाच एक भाग म्हणून गातेगाव येथील शेतकरी दुष्काळावर मात करण्यासाठी पुढं येऊन कांहीतरी करू पाहत आहे. अशावेळी त्याला मदत करणे आपले कर्तव्य आहे या भावनेतून गातेगाव येथील शेतकरी रामेश्वर माळी यांना रेशीम उद्योगासाठी बिनव्याजी कर्ज लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेने दिले असून लातूर जिल्ह्यात जवळपास चाळीस शेतक-यांना पंचेचाळीस लाखाचे बिनव्याजी कर्ज रेशीम उद्योगासाठी देण्यात आले आहे. अडचणीत सापडलेल्या शेक-यांना आर्थिक पाठबळ देत असताना बॅकेने कधी नियमांची आडकाठी येऊ दिली नाही. माञ नियम देखील कधी तोडले नाहीत आपला शेतकरी प्रामाणिक आहे तो लबाड तर मुळीच नाही. दुष्काळाच्या दुष्टचक्रात अडकल्याने तो अडचणीत आहे. अशा वेळी नियमांचे कारण देत त्याला मदती पासून रोखणे हे माणूसकीला न शोभनारे आहे. ही धारणा बाळगूनच आपण वाटचाल करत असल्याचे ते म्हणाले.
या कार्यक्रमास जिल्हा बॅंकेचे कर्ज व नियंत्रण अधिकारी सतीश देशमुख, शाखा तपासणीस विजयकुमार माळी, फील्ड ऑफीसर भगवान सांगवे, सावता माळी, ओमप्रकाश बनसोडे, महेश सूर्यवंशी, विविध संस्थांचे पदाधिकारी, नागरीक मोठ्या संख्येने ऊपस्थित होते.


Comments

Top