HOME   लातूर न्यूज

काँग्रेसकडून निरीक्षकांची नियुक्ती जाहीर

मस्के, ढमाले, थोरमोटे, वाघमारे यांच्यावर चार ग्रामीण सर्कलची जबाबदारी


काँग्रेसकडून निरीक्षकांची नियुक्ती जाहीर

लातूर: आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने काँग्रेस पक्ष कार्यकर्ते आणि मतदार यांच्यात समन्वय घडवून अधिकाधिक मतदान करून घेण्यासाठी माजी राज्यमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या सूचनेनुसार लातूर शहर मतदार संघातील चार ग्रामीण सर्कलमध्ये निरीक्षकांची नियुक्ती करण्यात येत असल्याचे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष ॲड व्यंकट बेद्रे यांनी जाहीर केले आहे.
या संदर्भाने जिल्हा काँग्रेसच्या वतीने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात ॲड.व्यकंट बेद्रे यांनी म्हटले आहे की, लातूर लोकसभा निवडणुकीस जिंकण्यासाठी पक्षाने सूक्ष्म नियोजन करून पदाधिकाऱ्यांना जबाबदाऱ्या वाटप केल्या आहेत. काँग्रेस पक्षासाठी अधिकाधिक मतदान करून घेण्याच्या दृष्टीने पदाधिकारी व कार्यकर्त्यांना वेगवेगळ्या स्तरावर नियुक्त्या देण्यात आल्या आहेत. त्या अनुषंगाने लातूर शहर मतदारसंघातील ग्रामीण भागात बाभळगाव सर्कल साठी सहदेव मस्के, पाखरसांगवी सर्कलसाठी रमेश थोरमोटे, हरंगुळसाठी परमेश्वर वाघमारे तर महापूर सर्कलसाठी पंडित ढमाले यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ज्येष्ठ नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या सहकार्यातून आपापल्या सर्कलमध्ये प्रचारयंत्रणा उभारणे, त्या यंत्रणेचे नियोजनबद्ध पद्धतीने संचालन करणे, बूथ नियोजनाच्या माध्यमातून काँग्रेस पक्षासाठी अधिकाधिक मतदान करून घेण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली असून ते आपली जबाबदारी अत्यंत प्रभावीपणे पार पाडतील, अशी अपेक्षा व्यक्त करून जिल्हाध्यक्ष ॲड.व्यकंब्‍ बेद्रे व तालुकाध्यक्ष दगडूसाहेब पडीले यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.


Comments

Top