HOME   लातूर न्यूज

जलस्वराज्य कामात घोटाळाः पत्रकार कार्यकर्त्याचे उपोषण

जिल्हा परिषद प्रशासनाच्या असंवेदनशील वृत्तीचा निषेध


जलस्वराज्य कामात घोटाळाः पत्रकार कार्यकर्त्याचे उपोषण

लातूर: शिरुर अनंतपाळ तालुक्यातील लक्कड जवळगा येथील ग्रामंपंचायतीने जलस्वराज्य कामात केलेल्या लाखोंच्या अनियमितता व भ्रष्टाचाराचा पोलखोल करुन पाहणार्‍या पत्रकार तथा अण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यासचे कार्यकर्ते दयानंद बाबूराव कुंभार यांनी २५ जानेवारी १९ पासून लातूर जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषण सुरु केले आहे, त्यांना आम आदमी पार्टी, लोकलढा आणि हम लोक संघटनेने पाठिबा दिला असून, संध्याकाळी उशिरापर्यंत उपोषणार्थीस जिल्हा परिषद प्रशासनाने कसलेली लेखी न देता आपल्या मुजोर कार्यपध्दती आणि भ्रष्टाचार्‍यांची पाठराखण करण्याच्या प्रवृत्तीची प्रचिती दिल्याने, आपने निषेध नोंदविला आहे. लक्कड जवळगा ता. शिरुर अनंतपाळ येथील ग्रामंपचायतीने लाखोंच्या जलस्वराज्यच्या कामात अनियमितता केली असल्याची कुणकुण लागल्याने पत्रकार, कार्यकर्ते दयानंद कुंभार यांनी ग्रामपंचायतीचे तत्कालीन ग्रामसेवक कांबळे यांच्याकडे माहिती अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत २०१७ मध्ये आवश्यक माहित मागितली, पण ती देण्यात आली नसल्याने कुंभार यांनी पंचायत समिती शिरुर अनंतपाळ येथील अपिलीय अधिकार्‍यांकडे प्रथम अपील केले. त्यावर सुनावणी घेवून माहिती देण्याची आदेश दिले होते, त्यावरही बदलून आलेल्या ग्रामसेवकाने आपल्या पदभारात ती माहिती मिळाले नसल्याचे सांगून चालढकल केली. नाराजीने दयानंद कुंभार यांनी राज्य माहिती आयुक्त औरंगाबादकडे अपील दाखल केले, तिथे राज्य माहिती आयुक्तांनी अर्जदारास मागणी केल्या प्रमाणे माहिती द्यावी असे आदेश दिले. त्या आदेशाला वर्ष होत आला तरी पंचायत समिती किंवा ग्रामपंचायतीकडून कुंभार यांना माहिती मिळाली नाही, त्यामुळे त्यांनी पंचायत समिती व जिल्हा परिषदेकडे, संबंधितांनी माहिती अधिकार कायद्याखाली माहिती देण्यात कुचराई केल्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी वेळोवेळी केली. २५ जानेवारी २०१९ पासून आमरण उपोषण करणार्‍याचा इशारा दिला होता, पण भ्रष्टाचार्‍यांची पाठराखण करीत जिल्हा परिषदेने बघ्याची भूमिका घेतली. त्यामुळे कुंभार यांनी आजपासून आमरण उपोषणाला जिल्हा परिषद समोर आरंभ केलाय. त्यांना आम आदमी पार्टी, हम लोग, लोकलढाने पाठिंबा दिला आहे, लोकलढाचे प्राचार्य डॉ.मधुकर मुंडे, आपचे शहर संयोजक बाळ होळीकर, जिल्हा समन्वयक सुमित दीक्षित, समन्वयक सैदोद्दीन सय्यद, सद्स्य नितीन चालक, निलंगा कोषाध्यक्ष बालाजी झरकर, नैमोद्दीन शेख व शेषनारायण वाघमारे, नामदेव खुडे यांनी प्रशासनाने यात वेळीच लक्ष घालण्याची मागणी केली आहे.


Comments

Top