HOME   लातूर न्यूज

कुंभारवाडीसह सहा गावांना पाणी पुरवठा योजना मंजूर

मुख्यमंत्री पेयजल योजना; रमेशअप्पा कराड यांचा पाठपुरावा


कुंभारवाडीसह सहा गावांना पाणी पुरवठा योजना मंजूर

रेणापूर: रेणापूर तालुक्यातील गरसुळी, कुंभारवाडी, फरदपूर, दवणगाव, चाडगाव व गव्हाण या गावांतील पाणी पुरवठा योजनांसाठी राज्याच्या पाणी पुरवठा व स्वच्छाता विभागाने मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमातून ०३ कोटी ४८ लाख, ८५ हजार रुपयांचा निधी नुकताच मंजूर केला आहे. सबंधित गावातील पाणी पुरवठा योजनांच्या मंजूरीसाठी पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्याकडे लातूर ग्रामीणचे भाजपा नेते रमेशअप्पा कराड यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून गरसुळी, कुंभारवाडी, फरदपूर, दवणगाव, चाडगाव व गव्हाण या सहा गावांचा अनेक वर्षापासून प्रलंबीत असलेला पाणी पुरवठा योजनेचा पश्न मार्गी लागला असल्याची माहिती रेणापूर पंचायत समितीचे सभापती अनिल भिसे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली.
रेणापूर तालुक्यातील गरसुळी, कुंभारवाडी, फरदपूर, दवणगाव, चाडगाव व गव्हाण या गावात पाणी पुरवठ्याची शाश्वत योजना नसल्यामुळे येथील ग्रामस्थांना तिव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत होता. दुष्काळ व टंचाईच्या काळात तर येथील नागरीकांना दोन ते तीन किलोमीटर एवढ्या अंतरापर्यंत पाण्यासाठी पायपिट करावी लागत होती. राज्यात भाजपा सत्तेत आल्यापासून सबंधीत गावातील पाणी टंचाईची परस्थिती लक्षात घेवून या गावांसाठी कायमस्वरुपी पाणी पुरवठा योजनेच्या मंजूरीसाठी पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्याकडे लातूर ग्रामीणचे भाजपा नेते रमेशअप्पा कराड हे ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे व पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या सहकार्याने वेळो-वेळी पाठपुरावा करीत होते.
दरम्यान राज्याच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमातून रेणापूर तालुक्यातील सहा गावांच्या पाणी पुरवठा योजनांच्या खर्चापोटी निधी मंजूर केला. गरसुळी या गावासाठी ८० लाख, २० हजार रुपये, कुंभारवाडी या गावासाठी ६२ लाख १२ हजार रुपये, फरदपूर या गावासाठी ६१ लाख, ६२ जार रुपये, दवणगाव या गावासाठी ६० लाख, ११
हजार रुपये, गव्हाण या गावासाठी ५५ लाख, ९० हजार रुपये व चाडगाव या गावासाठी २८ लाख, ९० हजार रुपये असे एकूण ०३ कोटी, ४८ लाख, ८५ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. सबंधीत गावांच्या पाणी पुरवठा योजनांबाबत प्रशासकीय बाबींची पुर्तता होऊन लवकरच या योजनांच्या कामास सुरुवात होणार असल्याची माहिती रेणापूर पंचायत समितीचे सभापती अनिल भिसे यांनी दिली.
रेणापूर तालुक्यातील गरसुळी, कुंभारवाडी, फरदपूर, दवणगाव, चाडगाव व गव्हाण या गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस, पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे, पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांचे व याकामी वेळो-वेळी पाठपुरावा केल्याबद्द भाजपा नेते रमेशअप्पा कराड यांचे गरसुळी, कुंभारवाडी, फरदपूर, दवणगाव, चाडगाव व गव्हाण येथील ग्रामस्थांनी आभार मानले आहेत.


Comments

Top