लातूर: येणार्या निवडणुकीपूर्वी भाजपा सरकारने धनगर समाजाला आरक्षण न दिल्यास या पक्षाचा विजय होणार नाही, विजयाचा गुलाल अंगावर पडू देणार नाही असा इशारा धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी दिला. धनगर समाजाला एसटीचे प्रमाणपत्र मिळावे यासाठी मागील ३०-४० वर्षांपासून प्रयत्नशील आहोत. मीही भाजपाचा कार्यकर्ता होतो. आरक्शःअण मिळत नाही हे पाहून बाहेर पडलो, सत्ताधारी भाजपाला पायउतार होणे किंवा धनगर समाजाचा एसटीत समावेश करणे हे दोनच पर्याय आहेत असाही दावा त्यांनी केला. आंबेडकर पार्कच्या मैदानावर झालेल्या या कार्यक्रमाला धनगर समाजाचे उत्तमराव जानकर, अण्णाराव पाटील, शिवदास बीडगर, डॉ. स्नेहा सोनकाटे, राजू काळे, अतिश बैकरे, सुभाष माने, सुरेश वाघमारे, बसवंतअप्पा उबाळे उपस्थित होते.
Comments