लातूर: विधी, न्याय, सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक क्षेत्रात आदर्शवत कार्य असलेले विधीज्ञ अॅड. हरिश्चंद्र विठ्ठलराव पाटील रेड्डी यांच्या निधनामुळे नव्या पिढीला कायम प्रेरणा देणारे व्यक्तिमत्व हरपले असल्याची भावना माजी राज्यमंत्री आमदार अमित देशामुख यांनी व्यक्त केली आहे.
आमदार देशामुख यांनी रेडडी पाटील कुटुंबीयांना पाठविलेल्या शोकसंदेशात म्हटले आहे की, हैद्राबाद येथे जाऊन ऊस्मानिया विद्यापीठात कायदयाचे उच्चशिक्षण घेतलेल्या अॅड. हरिशचंद्र रेड्डी यांनी प्रारंभी ऊस्मानाबाद व नंतर लातूर येथे वकीली व्यवसाय सुरू केला. देशपातळीवर कुठेही ते हा व्यवसाय करू शाकले असते परंतु आपल्या जन्मभुमिलाच त्यांनी कर्मभूमी बनवले. लातूरात त्यांनी वकीली व्यवसाय केला असला तरी पुर्वीचे हैद्राबाद संस्थान नंतर मराठवाडा, महाराष्ट्र आणि देशपातळीवर त्यांच्या वकीलीचा आदरयुक्त दबदबा निर्माण झाला होता. त्यामुळे देशपातळीवरील सर्व क्षेत्रातील वरीष्ठ व्यक्तिमत्वाबरोबर त्यांचा संपर्क आणि स्नेह निर्माण झाला होता. लातूरच्या वकीली क्षेत्रात पितामह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भाईच्या मार्गदर्शनाखाली वकीली व्यवसाय सुरू केलेले आणि त्यांच्या संपर्कात आलेली अनेक व्यक्तिमत्वे पुढे राज्य तसेच देशापातळीवरच्या विविध पदावर कार्यरत राहीली आहेत. विलासरावजी देशामुख साहेब पुणे येथे वकीलीचे शिक्षण घेवून लातूर येथे आले तेव्हा त्यांच्या समोरही अॅड. हरिश्चंद्र रेडडी यांचाच आदर्श होता. या व्यवसायात त्यांचे सहकार्य लाभल्याचा उल्लेख साहेबाकडून नेहमी केला जात असे. त्यामुळेच देशामुख कुटुंबीय आणि रेडडी कुटुंबियाचे सबंध कायम स्नेहाचे राहिले आहेत. विधी व सामाजिक क्षेत्रात आदर्श व्यक्तिमत्व म्हणून परिचित असलेले अॅड. हरिशचंद्र रेडडी यांच्या पुढाकारातून लातूरात आर्यसमाजाची चळवळ उभी राहीली. आज ते आपल्यात नसले तरी त्यांचे कार्य नव्या पिढीसाठी कायम मार्गदर्शक आणि प्रेरणादायी राहणार आहे. त्यांचा वारसा सुपुत्र मुख्य न्यायमुर्ती नरेश पाटील, दिनेश पाटील, विरेश पाटील हे विविध क्षेत्रात पुढे नेत आहेत. त्या पुढील पिढीतील रितेश, प्रतिक, राकेश, श्रुती, नितेश आणि स्नेहा हे सर्वजण आपल्या कुटुंबाचा आदर्शवत वारसा पुढे चालवतील हा विश्वास असल्याचेही आमदार देशामुख यांनी म्हटले आहे. रेडडी पाटील कुटुंबियास झालेल्या दु:खात मी व माझे कुटुंबीय सहभागी असल्याचे नमूद करून त्यांना या दु:खातून सावरण्याची इश्वराने शक्ती दयावी अशी प्रार्थना शोक संदेशाच्या शेवटी अॅड. हरिशचंद्र रेडडी यांना श्रध्दाजली वाहताना केली आहे.
Comments