HOME   लातूर न्यूज

नगरसेवक कव्हेकरांनी दिले उपचारासाठी दोन महिन्यांचे मानधन

लोकप्रतिनिधीपदाची जाण, मोहम्मद शेख यांना मिळाला आधार


नगरसेवक कव्हेकरांनी दिले उपचारासाठी दोन महिन्यांचे मानधन

लातूर: जनतेच्या सुख-दु:खात सहभागी होतो, तोच खरा लोकप्रतिनिधी असतो. पण आजकाल असे लोकप्रतिनिधी आढळत नाहीत. युवा नगरसेवक अजित पाटील कव्हेकर याला अपवाद आहेत. प्रभागातील नागरिकांच्या प्रत्येक सुख - दु:खात ते सहभागी असतात. प्रसंगी मदतही करतात. प्रभागातील एका नागरिकाच्या बोन मॅरोवरील उपचारासाठी त्यांनी अशीच मदत केली. आपले दोन महिन्यांचे वेतन त्यांनी उपचारासाठी देवून आपल्यातील संवेदनशील युवकाचे दर्शन घडवले तसेच इतरांनीही मदत करावी असे आवाहन केले.
प्रभाग क्रमांक १८ मधील मोहम्मद कासीम शेख हे आजारी असल्याची माहिती त्यांना मिळाली होती. त्यांच्या आजारपणाबाबत चौकशी केल्यानंतर त्यांच्यावर बोन मॅरो संदर्भात उपचार करावे लागणार असल्याचे समजले. अजित पाटील यांनी लागलीच त्यांना बोलावून घेतले. बोन मॅरोवरील उपचारासाठी मोठा खर्च येणार असल्याचे सांगण्यात आले. त्यावरून आपल्याकडून शक्य ती मदत करण्याचे आश्वासन अजित पाटील यांनी दिले. केवळ आश्वासन देऊनच ते थांबले नाहीत तर लगेच त्या रकमेचा धनादेश त्यांनी सुपूर्द केला. मोहम्मद कासिम शेख यांचे नातेवाईक इस्माईल शेख, सलीम शेख, नसीर शेख यांच्याकडे त्यांनी धनादेश देऊन आपल्यातील संवेदनशीलतेचे दर्शन घडवले. यावेळी नितीन शेंडगे, महादेव पिटले, विकास मोरे, रामभाऊ टोंपे, योगेश डोंगरे, राहुल मोरे,गणेश उळागड्डे आदींची उपस्थिती होती. समाजातील सर्वच घटकांनीही मोहम्मद कासीम शेख यांच्यावर उपचारासाठी मदत करावे असे आवाहनही अजित पाटील यांनी यावेळी बोलताना केले. सदरील रूग्णाचे नाव शेख इस्माईल कासीम, बँक खाते इंडियन बँकेचे असून खाते क्र. 6011402762 हा आहे. IFSC Code:-IDIB000L016 शाखा - शिवनेरी गेट,लातूर. फ़ोन करुन त्यांच्याशी संपर्क साधाता येईल 7020755361, 9665168822.


Comments

Top