HOME   लातूर न्यूज

श्री व्यंकटेश बालाजी मंदिरात गरूड खांबाची उभारणी


श्री व्यंकटेश बालाजी मंदिरात गरूड खांबाची उभारणी

लातूर: येथील गावभागातील श्री व्यंकटेश बालाजी मंदिरच्या जिर्णोध्दाराचे काम सुरू असून रविवारी, मंदिरात गरूड खांबाची विधीवत पूजा करून मंगलमय वातावरणात उभारणी करण्यात आली. येथील लाकूडउद्योजक खेताभाई पटेल यांनी गरूड खांबासाठी ३० फूट लांबीचे लाकूड उपलब्ध करून दिले आहे. हे लाकूड अखंड असून त्याचा वापर गरूड खांबासाठी करण्यात आला आहे. या खांबाची पायाभरणी व विधीवत पूजा करून त्याची उभारणी करण्यात आली. याप्रसंगी श्री व्यंकटेश बालाजी देवस्थानचे अध्यक्ष श्रीनिवास लाहोटी, सचिव विनोद अग्रवाल, कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष कांताप्रसाद राठी, जुगलकिशोर गिल्डा, डॉ. अनिल राठी, सत्यनारायण कर्वा, लक्ष्मीनिवास अग्रवाल, लक्ष्मीरमण लाहोटी, रमेश राठी, नयन नावंदर, ओमप्रकाश डागा, ईश्‍वर डागा, बजरंगलाल रांदड, प्रकाश कासट, राजकुमार पल्लोड, रामेश्‍वर तिवारी, विष्णुदास भुतडा, प्रदीप धूत, पांडुरंग मुंदडा, वास्तुविशारद शांतेश्‍वर बरबडे, रमेश बाहेती, आर. आर. तापडिया, द्वारकादास सोनी, दिनेश इन्नानी, संतोष गिल्डा, बजरंगलाल जोशी, कमलकिशोर अग्रवाल, गिरीधर जोशी, बाबुराव जाधव, सुनील राठी, राजू लोया, अनिल अग्रवाल, द्वारकादास बियाणी, किरण झंवर, गणेश हेड्डा, प्रल्हाद पाटील यांच्यासह भाविक - भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Comments

Top