HOME   लातूर न्यूज

खरेदीदारांकडून अडवणूक, आडते अन शेतकरी अडचणीत

मनसेने केली तीव्र निदर्शने, लवकर उपाय करण्याचा इशारा


खरेदीदारांकडून अडवणूक, आडते अन शेतकरी अडचणीत

लातूर: कृषी उत्पन्न बाजार समिती समोर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शेतकरी हिताच्या अनेक मागण्यांसाठी बाजार समितीच्या वेळकाढू आणि निष्क्रिय कार्यपध्दती विरोधात जिल्हाध्यक्ष संतोष नागरगोजे यांच्या नेतृत्वाखाली तिव्र निदर्शने करण्यात आली. ज्यामध्ये अनेक मागण्यांचा समावेश आहे. नुकत्याच झालेल्या ईनाम प्रक्रियेत व्यापाऱ्यांमुळे अडत्याचें पेमेन्ट अडकून शेतकरी अडचणीत आला आहे. कारण गेली अनेक महिन्यांपासून आडती त्यांचे पेमेंट करत नाही. तसेच हमीभावाप्रमाणे अडत दुकानदार शेतमाल खरेदी करत नाहीत. शेतमालाचा सौदा एकतर सर्व दुकानात होत नाही आणि त्यातही पोटली व्यवहारामूळे शेतकऱ्यांचे १००-१५० रुपयांचे नुकसान होते. हमाल हे हमाली शिवाय शेतमालातून पायली घेतातच. कधी कधी बाजार अचानकपणे बंद होतो आणि शेतमाल पडून राहतो. उत्सव सणांमध्ये बाजार ५-५ दिवस सलग बंद राहतो. त्यामुळे भाव पडतात आणि शेतकऱ्यांचे नुकसान होते. या सर्व बाबींवर येत्या ०८ दिवसात समितीने कार्यवाही केलेली दिसली नाही तर कार्यालयात मनसे खळ खट्याक करेल असा इशारा समिती सचिवाना मनसे जिल्हाध्यक्ष संतोष नागरगोजे यांनी दिला. या आंदोलनात मनसे जिल्हाध्यक्ष डॉ नरसिंह भिकाणे, शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष भागवत शिंदे, जिल्हाउपाध्यक्ष भास्कर औताडे, सचिव रवी सुर्यवंशी, शहराध्यक्ष मनोज अभंगे, तालुकाध्यक्ष बालाजी भरबडे, उपाध्यक्ष गोविंद सोदले, राजाभाऊ शिंदे लालासाहेब मोहिते, अजय कलशेट्टी, बालाजी कांबळे, जहांगीर शेख, चंदू केंद्रे, राम वाकुडे, गोविंद भोळे, शिवाजी हरगावकर, गणपती राठोड, अजित पुजारी, सुमीत राठोड, किरण कुंडले, संतोष जाधव, मनोज पांचाळ, किरण जाधव आदींसह अनेक मनसे कार्यकर्ते उपस्थित होते.


Comments

Top