लातूर: विवेकानंद वैद्यकीय प्रतिष्ठानचे डॉ. अशोककाका कुकडे यांना वैद्यकीय क्षेत्रासोबतच सामाजिक क्षेत्रातही योगदान दिल्याबद्दल भारत सरकारच्यावतीने पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला. डॉ. कुकडे यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल भाजपाचे युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर व जि.प.चे उपाध्यक्ष रामचंद्र तिरूके यांनी भेट देवून त्यांना शुभेच्छा दिल्या.
लातूर येथील विवेकानंद वैद्यकीय प्रतिष्ठान व संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. अशोक कुकडे यांना भारत सरकारच्यावतीने पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. डॉ. कुकडे यांनी विवेकानंद वैद्यकीय प्रतिष्ठानच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यासह जवळील जिल्ह्यातील गरजू रूग्णांनाही वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देवून आरोग्य सेवेचा महायज्ञ अविरत चालू ठेवला आहे. आरोग्य सेवेसह सामाजिक क्षेत्रातही डॉ. कुकडे यांनी उल्लेखनीय कार्य करून समाजाला दिशा दाखविण्याचे काम केले आहे. त्यांनी केलेल्या या कार्याची दखल घेत भारत सरकारच्या वतीने डॉ. कुकडेंना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झालेला आहे. हा पुरस्कार मिळाल्याने लातूरच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. डॉ. कुकडे यांना पद्मभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल भाजपाचे युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर व जि.प.चे उपाध्यक्ष रामचंद्र तिरूके यांनी कुकडे यांना निवासस्थानी भेटून उभयतांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी संजय जेवरीकर, सुजीत नाईक उपस्थित होते.
Comments