लातूर: माईर्स एमआयटी, पुणे व एमआयटी विश्वशांती विद्यापीठ पुणेचे संस्थापक-अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांच्या ७८ व्या वाढदिवसानिमीत्त् येथील एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालय व यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालय, एमआयडीएसआर दंत महाविद्यालय व एमआयपी फिजीओथेरपी महाविद्यालयाच्या वतीने ०२ ते ०५ फेब्रुवारी या कालावधित विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांच्या वाढदिवसानिमीत्त् येथील एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालय व यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालयातील श्रीमती सरस्वती कराड रक्तपेढी येथे शनिवार, ०२ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता रक्तदान शिबिर तर मंगळवार ०५ फेब्रुवारी रोजी महिलांसाठी मोफत कर्करोग (स्तन व गर्भाशय) निदान व उचार मोहिमेचे यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालय येथे आयोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर एमआयडीएसआर दंत महाविद्यालयाच्या वतीने रविवार, ०३ फेब्रुवारी रोजी सकाळी ०८ ते ११ या वेळेत रेणापूर तालुक्यातील बामणी येथे मोफत दंत आरोग्य तपासणी शिबीर व एमआयपी फिजीओथेरपी महाविद्यालयाच्या वतीने मोफत फिजीओथेरपी उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले असून प्रा. डॉ. विश्वनाथ कराड यांच्या वाढदिवसानिमीत्त् बामणी येथे वृक्षारोपनही करण्यात येणार आहे. त्याचबरोबर रविवारी १२ ते ०३ या वेळत औसा तालुक्यातील हासेगाव येथील सेवालय येथे एमआयव्हीसह जगणाऱ्या रुग्णांसाठी मोफत दंत आरोग्य तपासणी शिबिर घेवून टुथपेस्ट, टुथब्रश व फळांचे वाटप करण्यात येणार आहे. तर एमआयपी फिजीओथेरपी महाविद्यालयाच्या वतीने रविवार, ०३ फेब्रुवारी रोजी दुपारी ०४ वा. मातोश्री वृध्दाश्रम, लातूर येथे ज्येष्ठ नागरीकांसाठी भौतिक उपचाराबाबत प्रबोधनपर व्याख्यान व नाटीकेचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांच्या वाढदिवसानिमीत्त् आयोजित विविध सामाजिक उपक्रमांचा व मोफत आरोग्य शिबीरांचा नागरीकांनी लाभ घ्यावा असे आवाहन एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालयाचे कार्यकारी संचालक श्री रमेशअप्पा कराड व आधिष्ठाता डॉ. एन. पी. जमादार यांनी केले आहे.
Comments