HOME   लातूर न्यूज

प्रभाग ०५ मधील खत निर्मिती प्रकल्पाची वर्षपूर्ती

स्वच्छता कर्मचाऱ्यांचा गौरव व नागरिकांना घरोघरी खताचे वाटप


प्रभाग ०५ मधील खत निर्मिती प्रकल्पाची वर्षपूर्ती

लातूर: प्रभाग ०५ मध्ये मागील वर्षी नगरसेवक विक्रांत गोजमगुंडे यांनी स्वखर्चातून खत निर्मिती प्रकल्पाची उभारणी केली होती. या प्रकल्पाने यशस्वीरित्या एक वर्ष पूर्ण केले आहे. या निमित्ताने प्रभागातील नागरिक व नगरसेवकांनी एकत्रित येत वर्षपूर्ती कार्यक्रमाचे आयोजन केले होते. प्रभागांतर्गत उभारण्यात आलेला मराठवाड्यातील पहिला व महाराष्ट्रात सर्वोत्तम ठरलेल्या या प्रकल्पात वर्षभरात सुमारे १०९५ टन कचऱ्यावर प्रक्रिया करून १३५ खत निर्मिती करण्यात आली आहे. यामुळे मनपाची दरमहा रुपये ४५००० बचत व रुपये १५००० उत्पन्न होत आहे. वर्षपूर्तीनिमित्त नागरिकांना ओल्या कचर्‍याने बनलेला खत घरोघरी वाटप करण्यात आला.
यावेळी हा प्रकल्प यशस्वी करण्याकरिता अथक परिश्रम घेणाऱ्या स्वच्छता कर्मचार्‍यांना मनपा आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय ढगे, जिल्हा नियोजन अधिकारी प्रियंका बोकील, जिल्हा प्रशासन अधिकारी तथा अतिरिक्त आयुक्त सतीश शिवणे यांच्या हस्ते ड्रेस वाटप करून गौरवण्यात आले. प्रभाग ५ आणि घनकचरा व्यवस्थापनात विविध उपक्रम राबवत नेहमीच आदर्श निर्माण केला असून याकरिता सहकार्य करणाऱ्या प्रभागाचे नागरिक व मनपा प्रशासनाचे आभार विक्रांत गोजमगुंडे यांनी व्यक्त केले.
यावेळी बोलताना मनपा आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर यांनी लातूर मधील घनकचरा व्यवस्थापन व खत निर्मिती प्रकल्प महाराष्ट्रात दिशादर्शक ठरत असून याची सुरुवात प्रभाग ५ पासून झाल्याने प्रशासनास मोठी मदत झाल्याचे सांगत जनतेच्या सहभागाबद्दल लातूरकरांचे आभार व्यक्त केले. कार्यक्रमाप्रसंगी शहरातील घनकचरा व्यवस्थापनात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल सहाय्यक आयुक्त वसुधा फड, उज्वला शिंदे, उपायुक्त संभाजी वाघमारे, मुख्य स्वच्छता निरीक्षक सूर्यकांत राऊत, प्रभाग ५ चे स्वच्छता निरीक्षक मुनीर शेख, अकबर शेख यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास मुख्य लेखाधिकारी प्रभाकर डाके नगरसेविका पूजा पंचाक्षरी सुभाष पंचाक्षरी, राजा मनियार रघुनाथ मदने, तबरेज तांबोळी शहबाज पठाण, संपादक त्र्यंबक कुंभार, लिंबराज पन्हाळकर, राजन गिरवलकर, अभियंता प्रेमनाथ घंटे, विजय ओळखणे, रमाकांत पिडगे, समाधान सूर्यवंशी, सुर्यकांत काळे,
सुनिता उबाळे, रेखा लांडगे, आशिष साठे, संजय कांबळे, गोविंद पाटील, शिवाजी देशमुख, अविनाश देशमुख यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Comments

Top