HOME   लातूर न्यूज

वैशाली देशमुख यांना ऊस भूषण पुरस्कार

विलास कारखाना संचालक मंडळाकडून सत्कार


वैशाली देशमुख यांना ऊस भूषण पुरस्कार

लातूर: वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणे यांनी हेक्टरी सर्वाधिक ऊस उत्पादन घेतल्याबद्दल विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन श्रीमती वैशाली विलासराव देशमुख यांना मानाचा ‘ऊस भूषण’ पुरस्कार देवून नुकतेच गौरविण्यात आले. या यशाबददल विलास कारखाना संचालक मंडळाने त्यांची बाभळगाव येथील निवासस्थानी भेट घेवून त्यांचा सत्कार केला.
यावेळी व्हा.चेअरमन गोविंद बोराडे, संचालक सर्वश्री रामचंद्र सुडे, उमेश बेद्रे, रमेश थोरमोटे, रवींद्र काळे, जयचंद भिसे, नितीन पाटील, जगदिश चोरमले, गोवर्धन मोरे, भारत आदमाने, युवराज जाधव, नरसिंग बुलबुले, भैरवनाथ सवासे, चंद्रकांत टेकाळे, प्राचार्य हेमंत पाटील आदी उपस्थित होते.
विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन श्रीमती वैशाली विलासराव देशमुख यांनी बाभळगाव येथील आपल्या शेतीमध्ये आधुनिक ऊस शेती केली. या शिवाय शेड-नेटच्या माध्यमातूनही त्यांनी इतर अनेक उत्पादने घेतली आहेत. त्यांनी शेतीमध्ये केलेले नव–नवीन प्रयोग विशेषत: ऊस शेती मध्ये केलेल्या उत्पादनाची दखल घेवून हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. राज्याच्या उत्तरपूर्व विभागात सर्वसाधारणपणे हेक्टरी होणाऱ्या ऊस उत्पादनाच्या तुलनेत विक्रमी म्हणजे प्रति हेक्टरी ३२१.२१ मेट्रीक टन ऊस उत्पादन घेतले आहे. त्यांच्या या कर्तृत्वाची दखल घेवून पुणे येथे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने अत्यंत मानाचा समजला जाणारा ऊस भूषण हा पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान केला आहे.
श्रीमती वैशालीताई देशमुख यांचा कारखान्याचे सर्व संचालकानी बाभळगाव येथील निवासस्थानी त्यांची भेट घेवून सत्कार केला. याप्रसंगी अधिकारी एल.एम.देशमुख, बी.बी.साखरे, एस.व्हि.सोनवणे, एन.बी.देशपांडे, मिलींद पाटील आदी उपस्थित होते.


Comments

Top