लातूर: लातूरचे महापौर सुरेश पवार यांनी मंजूर बांधकामापेक्षा अधिक बांधकाम केल्याचा आरोप असून त्या अनुषंगाने तपासणी झाली आणि एक सुनावणीही झाली. आता १८ फेब्रुवारी रोजी या प्रकरणी अंतीम सुनावणी होणार आहे. अनधिकृत बांधकाम हटवावे आणि त्यांचे नगरसेवकपदही रद्दबातल करावे अशी मागणी विरोधकांनी केली आहे. वीर हनुमंतवाडी भागात पवारांचे घर आहे. त्यावर अनधिकृत बांधकाम केल्याची तक्रार अशोक गोविंदपूरकर यांनी केली आहे. या तक्रारीनुसार आयुक्तांनी सुनावणी घेतली. उपायुक्तांमार्फत बांधकामाची पाहणीही करावी असे आदेश आयुक्तांनी दिले होते. उपायुक्त हर्षल गायकवाड, नगर रचनकार सूर्यवंशी आणि अन्य संबंधित कर्मचार्यांनी तांत्रिक पद्धतीने तपासणी केली. पंचनामाही केला. पाहणीचा अहवाल आयुक्तांकडे दिला जाईल. त्यानंतर १८ फेब्रुवारी रोजी अंतीम सुनावणी होणार आहे.
Comments