HOME   लातूर न्यूज

बीबी ठोंबरे यांना उद्योगरत्न पुरस्कार

आदर्श मैत्री फाऊंडेशनचे नवरत्न पुरस्कार, मान्यवरांच्या हस्ते वितरण


बीबी ठोंबरे यांना उद्योगरत्न पुरस्कार

लातूर: राज्यातील विविध क्षेत्रांत शुन्यातून विश्‍व निर्माण करीत आपल्या कार्याचा ठसा उमटवून इतरांसाठी आदर्श ठरलेल्या व्यक्तींचा आदर्श मैत्री फाऊंडशेनच्या वतीने आदर्श रत्न पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो. गतवर्षीपासून सुरु झालेल्या या पुरस्काराच्या यावर्षीच्या नवरत्न पुरस्कारांची घोषणा फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आली. या पुरस्कारामध्ये मुख्य सत्कारमूर्ती म्हणून बी. व्ही. ठोंबरे यांना आदर्श उद्योगरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. त्यांच्यासह इतर आठ जणांना देण्यात येणार्‍या पुरस्काराचे वितरण लवकरच मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती आदर्श मैत्री फाऊंडेशनचे अध्यक्ष संतोष बिराजदार यांनी दिली .
स्वकर्तृत्वावर शून्यातून विश्‍व निर्माण करीत आपल्या कार्याचा ठसा विविध क्षेत्रांमध्ये उमटवून समाजासाठी आदर्श ठरणाऱ्या अनेक व्यक्ती राज्यभरात आहेत. या व्यक्तीमत्वांची ओळख इतरांना करून देत त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा या उद्देशाने गतवर्षीपासून आदर्श मैत्री फाऊंडेशनच्या वतीने आदर्शरत्न पुरस्कार देण्यात येतो. उद्योग, कायदा, प्रशासन, कृषी ,कला, प्रसिद्धीमाध्यम , महिला, यासह शौर्य क्षेत्रात ठसा उमटविणार्‍या राज्यातील रत्नांचा गौरव करण्यात येतो.
यावर्षी उद्योग क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणारे नॅचरल शुगरचे अध्यक्ष बी. व्ही. ठोंबरे यांना उद्योगरत्न तर महिलांच्या उन्नती व प्रगतीसाठी काम करणार्‍या सौ. राजश्री हेंमत पाटील यांना आदर्श नारीरत्न पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. कला क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करून आंतरराष्ट्रीय पातळीवर ठसा उमटविणारे प्रमोद कुर्लेकर यांना आदर्श कलारत्न तर पोलीस क्षेत्रात शौर्य गाजवणारे सुधाकर बावकर यांना आदर्श शौर्यरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून दुसर्‍यांसाठी मार्गदर्शक ठरलेले शेतकरी मधुकर चिद्रे यांना आदर्श कृषीरत्न तर प्रशासनात उल्लेखनिय कार्य करणार्‍या गटशिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे यांना आदर्श प्रशासन रत्न पुरस्कार देण्यात येणार आहे. समाज हितासाठी उल्लेखनिय कार्य करून आपल्या कार्याचा ठसा उमटविणारे जलयुक्त शिवारच्या माध्यमातून जलचळवळ उभारण्यासाठी योगदान देणारे आर्ट ऑफ लिव्हिंगचे मकरंद जाधव यांना आदर्श समाजरत्न तर लोकशाहीचा चौथा स्तंभ बळकट करण्यासाठी प्रसिध्दी माध्यमात काम करणारे झी 24 तासचे शशिकांत पाटील यांना आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार घोषित करण्यात आलेला आहे. न्याय देवतेच्या माध्यमातून गरजूंना न्याय देण्यासाठी अविरतपणे काम करणारे विधिज्ञ अ‍ॅड. उदय गवारे यांना आदर्श कायदारत्न पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
फाऊंडेशनच्या वतीने देण्यात येणार्‍या या पुरस्कारांसाठी निवड समितीने त्यांच्या कामाचा व सामाजिक क्षेत्रातील कार्याचा आढावा घेऊन हे पुरस्कारार्थी निवडले आहेत. फाऊंडेशनच्या वतीने देण्यात येणार्‍या या पुरस्कारांचे लवकरच मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात येणार असल्याची माहिती फाऊंडेशनचे अध्यक्ष संतोष बिराजदार, ॲड शिवाजी शिंदे, प्रा. शिवराज मोटेगावकर, तुकाराम पाटील, योगेश कर्वा, ईश्वर बाहेती, प्रा. अविनाश सातपुते, प्रा. उदय देशपांडे, वसंतराव काजळेकर, अनिल पवार, शिरीष कुलकर्णी, चंद्रकांत कातळे, प्रा. सुधाकर तोडकर, ॲड बी.एल शिंदे, निलेश राजमाने, शिवाजी हांडे, उज्वला पाटील, विवेक सौताडेकर, डॉ. उत्तम देशमाने, ॲड दशरथ सरवदे, अरविंद औरादे, संगमेश्वर बोमणे, निजाम शेख, आसिफ शेख, नंदकुमार साळुंके यांनी दिली.


Comments

Top