HOME   लातूर न्यूज

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना ५० हजारांची मदत

बळीराजा सबलीकरण योजनेत रमेशअप्पा कराड यांनी केले वितरण


आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना ५० हजारांची मदत

रेणापूर: बळीराजा सबलीकरण योजनेअंतर्गत रेणापूर तालुक्यातील आत्महत्याग्रस्त नऊ शेतकरी कुटुंबांना प्रत्येकी ५० हजार रुपयाची मदत लातूर ग्रामीणचे भाजपा नेते रमेशअप्पा कराड यांच्या हस्ते रेणापूर पंचायत समिती येथे वितरीत करण्यात आली.
यावेळी रेणापूर पंचायत समितीचे सभापती अनिल भिसे, रेणापूरचे नगराध्यक्ष अभिषेक अकनगिरे, उप सभापती आनंत चव्हाण, गटनेते रमेश सोनवणे, भाजपाचे तालुकाध्यक्ष ॲङ दशरथ सरवदे यांची प्रमुख उपस्थिती होती. रेणापूर तालुक्यातील नापीक व इतर कारणाने नऊ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबांना मदत करता यावी यासाठी शासनाने सुरू केलेल्या बळीराजा सबलीकरण योजनेअंतर्गत आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना प्रत्येकी ५० हजार रुपयाचे धनादेश भाजपा नेते रमेशअप्पा कराड यांच्या हस्ते श्यामल विष्णुपंत जाधव - मोरवड, छाया राम भिसे - भोकरंबा, कमल मंचकराव शिंदे - पोहरेगाव, नरहरी प्रल्हाद कराड - वांगदरी, श्रीमती भाग्यश्री मुंडे - वंजारवाडी यांना वितरित करण्यात आले. तर यावेळी छबूबाई फुसंगे - खलंग्री, पार्वती उत्तम माने - चाडगाव, हांडगे मनिषा गणेश - पोहरेगाव, धनंजय नागोराव चव्हाण - वाला हे लाभधारक कुटुंब काही अडचणीमुळे उपस्थित राहू शकले नाहीत.
या प्रसंगी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी काळे, कोषागार अशोक ढमाले, कृषि पर्यवेक्षक जगन्नाथ कदम, सूर्यवंशी यांच्यासह सतीश आंबेकर, वसंत करमुडे, राजकिरण साठे, श्रीकृष्ण पवार, विजय चव्हाण, चंद्रकांत कातळे, उज्वल कांबळे, अभिजित मद्दे, दता सरवदे, लक्ष्मण खलंग्रे, अंतराम चव्हाण, विठ्ठल कसपटे, दिनकर राठोड, सदाशिव राठोड, श्रीमंत नागरगोजे, धनंजय म्हेत्रे, चंद्रसेन रेड्डी यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.


Comments

Top