लातूर: अवाजवी नियमबाह्य व बेकायदेशीर कर लागू करुन त्यांची मनपाच्या वतीने वसुली करण्यात येत असल्याबद्दल व्ही मित्र मंडळाच्या वतीने ॲड व्यंकट बेंद्रे यांनी उच्च न्यायालयात याचिका क्र.३९४२/१८ दाखल केली आहे व श्री प्रकाश पाठक यांनी पण स्वतंत्र जनहित याचिका दाखल केली आहे या दोन्ही याचिकाची एकत्रित सुनावणी सुरु आहे. यामध्ये मनपाला १८ फेब्रुवारी पर्यंत स्थगिती देण्याचा निर्णय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांनी दिला आहे.
लातूर महानगरपालिकेच्या वतीने गेल्या काही महिन्यांपूर्वी नागरिकांकडून वसूल करण्यात येणाऱ्या विविध करामध्ये भरमसाठ वाढ करण्यात आली होती. याबाबत व्ही मित्र मंडळाच्या वतीने निवेदने दिली होती. विविध आंदोलने करण्यात आली होती. याकडे दुर्लक्ष करीत मनपाच्या वतीने करवसुली करण्यात येत होती. त्याला सनदशीर विरोध करण्यात येत आहे. करवाढीच्या सुनावणीमध्ये महानगरपालिकेने करवाढ करीत असताना कोणत्याही तरतुदींचे पालन केलेले नाही म्हणजे मनपा कायदा कलम ९९, १२७, १२९ व त्याचे नियम यांची पुर्तता केलेली नाही. त्या अनुषंगाने मनपाच्या कोणत्याही सभागृहाचा मंजुरी ठराव नाही असे मुद्दे उपस्थित केल्यावरुन उच्च न्यायालयाने लातूर महानगरपालिकेला १८.०२.२०१९ पर्यंत वाढीव कर आकारणी वसूल करु नये व जुन्या दरानेच कर स्विकारावे असे आदेश केले आहेत. म्हणून लातुरकरानी वाढीव कर भरु नये असे आवाहन व्ही मित्र मंडळाने केले आहे.
Comments