लातूर: लातूर महानगरपालिकेत वर्ग दोन, तीन आणि चार श्रेणीतील कर्मचार्यांनी बेमुदत संपाची हाक दिली असून आठ फेब्रुवारीपासून संपाला सुरुवात होणार आहे. यात अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्यांचाही समावेश असेल अशी माहिती कर्मचारी संघटनेनं प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. मनपा कर्मचार्यांच्या कसल्याही समस्यांकडे लक्ष देत नाही, मागण्यांकडे डोळेझाक केली जाते, आजवर कुठल्याही प्रश्नी न्याय मिळाला नाही. कर्मचार्यांचे दोन महिन्यांचे थकलेले वेतन तात्काळ द्यावे, सेवा निवृत्त कर्मचार्यांचे निवृत्ती वेतन प्रत्येक महिन्याच्या ०१ तारखेला द्यावे, सहाय्यक अनुदान मिळत नसेल तर मनपाची नगरपालिका करावी, कर्मचार्यांच्या पगारातून कपात केलेली रक्कम तात्काळ संबंधितांच्या खात्यावर जमा करावी. या मागण्या मान्य न झाल्यास होणार्या परिणामांना मनपा जबाबदार असेल असेही म्हटले आहे.
Comments