लातूर: स्मार्ट फोन द्वारे व्यवहारामध्ये नव्याने वापरात आलेल्या चलनी नोटा ओळखण्याचे तसेच ज्यांच्याकडे स्मार्ट फोन नाही अशा अंधांना नोटांवरील खुणांचा साह्याने चलनी नोटा ओळखण्याचे प्रशिक्षण राज्यस्तरीय कार्यशाळेत प्रशिक्षक स्वागत थोरात व सौरभ चोघुले यांनी दिले. अत्रिवरद प्रतिष्ठान, लातूर व सावी फौंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने लातूरचा शासकीय अंध शाळेत दोन दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचा दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात प्रशिक्षक स्वागत थोरात यांनी अंधांना पांढरी काठी वापरण्यावर भर दिला. रस्त्यावर वावरताना इतर ज्ञानेंद्रिय वापरून बारीक बारीक गोष्टी, आवाज कसे टिपायचे त्याचा संदर्भ लक्षात घेऊन अंधानी स्वतःची सुरक्षितता कशी करायची रस्त्यावरून कसे चालायचे, रस्ता कसा ओलांडायचा एखाद्या रस्त्यावरून जाताना परत त्याच रस्त्यावरून पर्त येताना खुणा लक्षात ठेवून त्या रस्त्याचा नकाशा डोक्यात कसा ठेवायचा याचे प्रशिक्षण अंधांना कार्यशाळेत मिळाले. वेगवेगळ्या खेळांच्या माध्यमातून स्मरणशक्ती, एकाग्रता मेंदू व बुद्धीचा समन्वय कसा साधायचा याचेही प्रशिक्षण दिले. स्वागत थोरात यांनी अंधांना दिले. कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रात अंधांना स्पर्षज्ञानाचा द्वारे फळे, भाज्या ओळखण्याचेही प्रशिक्षण देण्यात आले. कार्यशाळेचा यशस्वीतेसाठी प्रवीण शिवनगीकर, विनोद चव्हाण, आशिद बनसोडे, विकी कांबळे, अनिल कांबळे, चेतन धुर्वे, ज्ञानेश्वर गोसावी आदींनी परिश्रम घेतले.
Comments