लातूर: विविध मागण्यांसाठी मनपाचे वर्ग दोन, तीन आणि चार श्रेणीतील कर्मचारी कालपासून संपावर गेले. अत्यावश्यक सेवाही दिल्या जाणार नाहीत असे संपकर्यांनी काल बजावले होते. याबद्दल आयुक्त आणि संपकरी कर्मचार्यांच्या नेत्यात चर्चा झाली. नागरिकांची अडचण होऊ नये म्हणून अत्यावश्यक सेवा चालूच ठेवाव्यात अशी विनंती आयुक्तांनी केली. सोमवारी संपावर तोडगा काढू असे त्यांनी सांगितल्याने अत्यावश्यक सेवा चालू ठेवल्या आहेत. पाणी पुरवठा, अग्नीशमन सेवा आणि आरोग्य सेवा नियमित आहेत. दरम्यान संपकर्यांना उप महापौर देवीदास काळे यांना पाठिंबा दिला होता. नियमित वेतन आणि निवृत्ती वेतन द्यावे या प्रमुख मागण्यांसाठी कालपासून हे कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहेत.
Comments