लातूर: महेश प्रोफेशनल फोरम पुणेद्वारा आयोजित राज्यस्तरीय महेश आयडॉल स्पर्धेत येथील सौ. कल्पना श्याम भट्टड यांनी निवडक दहा स्पर्धकांतून चौथे स्थान पटकावले. हा सन्मान मिळवणाऱ्या लातूरमधील माहेश्वरी समाजातील त्या पहिल्या व एकमेव महिला सदस्य आहेत.
कोथरूड, पुणे येथील एमआयटी शिक्षण संस्था परिसरातील स्वामी विवेकानंद सभागृहात या स्पर्धेची अंतिम फेरी रविवारी घेण्यात आली. या त्रिस्तरीय फेरीतील प्रथम चरणात सर्व स्पर्धकांनी तीन मिनिटांत आपली ओळख करून द्यावयाची होती. यात सौ. कल्पना भट्टड यांनी चित्रफितीद्वारे आपल्या कार्याची तसेच कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराशी खंबीरपणे झुंज कशी देऊन या आजारावर यशस्वीपणे कशी मात केली, याबद्दल माहिती दिली. त्यांची जिद्द, झुंज व मनोनिग्रह ऐकून उपस्थितांचे डोळे पाणावले. द्वीतीय व तृतीय चरणात विविध विषयांवर प्रश्नोत्तरे घेण्यात आली. या सर्व टप्प्यानंतर सौ. कल्पना भट्टड यांनी चौथे स्थान पटकावले व सन्मानपत्र मिळवले० आदित्य बिर्ला ग्रुपचे व्हाईस प्रेसिडेंट व्यंकटेश माहेश्वरी यांच्या हस्ते हे सन्मानपत्र प्रदान करण्यात आले. महेश प्रोफेशनल फोरमचे सर्व पदाधिकारी सदस्य परीक्षक व्यंकटेश माहेश्वरी, दिनेश साबू, प्रिया माहेश्वरी व महेश आयडॉलचे आतापर्यंतचे मानकरी तसेच महाराष्ट्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पंकज मोदी, सचिन चितलांगे, नितीन सोनी, संदीप नवाल, डॉ. अक्षय बियाणी, योगेश जाजू, सविता झंवर यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन राहुल लड्डा, सीमा भन्साळी, अनुश्री बियाणी यांनी केले. सौ. कल्पना भट्टड यांच्या या सन्मानाबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
Comments