HOME   लातूर न्यूज

रविवारी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परिक्षा

जिल्हयातील २५ उपकेंद्रावर कलम १४४ लागू


रविवारी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परिक्षा

लातूर: : रविवार १७ फेब्रुवारी २०१९ रोजी सकाळी १० ते दुपारी १२ व दुपारी ०३ ते ०५ या काळात महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्यसेवा पूर्व परीक्षा जिल्हयातील विविध २५ उपकेंद्रावर आयोजित करण्यात आली आहे. या सर्व उपकेंद्रावर फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागू करण्यात येत असल्याचे अप्पर जिल्हादंडाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे यांनी सांगितले.
देशीकेंद्र विदयालय, सिग्नल कॅम्प लातूर, राजर्षि शाहू कला महाविद्यालय बस स्टँडजवळ लातूर, राजर्षि शाहू वाणिज्य महाविदयालय बस स्टँडजवळ लातूर, संगणक शास्त्र व माहिती तंत्रज्ञान महाविदयालय (कॉकसीट) अंबाजोगाई रोड लातूर, महात्मा बसवेश्वर विज्ञान महाविदयालय लातूर, श्रीमती सुशिलादेवी देशमुख महाविदयालय लातूर, यशवंत विदयालय नांदेड रोड लातूर, दयानंद वाणिज्य महाविदयालय, बार्शी रोड लातूर, परिमल विदयालय नारायण नगर लातूर, जिजामाता कन्या प्रशाला नांदेड रोड लातूर, राजर्षि शाहू विज्ञान महाविदयालय बस स्टँडजवळ लातूर, दयानंद विधी महाविदयालय लातूर, एम.एस.बिडवे इंजिनिअरींग कॉलेज बार्शी रोड लातूर, गोदावरी लाहोटी कन्या विदयालय दयाराम रोड लातूर, मारवाडी राजस्थान विदयालय लातूर, दयानंद कला महाविदयालय लातूर, ज्ञानेश्वर विदयालय शाहू चौक लातूर, राजर्षी शाहू ज्युनीअर विज्ञान महाविदयालय बसवेश्वर चौक लातूर भाग अ, राजर्षी शाहू ज्युनीअर विज्ञान महाविदयाल बसवेश्वर चौक लातूर भाग ब, पुरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतन नंदी स्टॉप लातूर, सरस्वती विदयालय प्रकाश नगर लातूर, जय क्रांती माध्यमिक व उच्च माध्यमिक विदयालय, सिताराम नगर लातूर, बसवणप्पा वाले न्यु इंगलीश स्कूल संभाजी नगर लातूर, केशवराज विदयालय श्याम नगर लातूर या ठिकाणी ही परिक्षा होणार आहे.
येथील परिसरात परीक्षा केंद्रावर मोठया प्रमाणावर परीक्षार्थी येणार आहेत. त्यामुळे परीक्षा कालावधीत परीक्षा केंद्रावर व परिसरात गर्दीमुळे कोणताही अनुचित प्रकार घडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये मिळालेल्या अधिकाराचा वापर करुन या परीक्षा केंद्राच्या १०० मीटर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश अप्पर जिल्हादंडाधिकारी अनंत गव्हाणे यांनी दिले आहे.
परीक्षा केंद्र परिसरात पाच किंवा अधिक व्यक्तींना एकत्रितरित्या प्रवेश घेता येणार नाही. कोणत्याही घोषणा देता येणार नाहीत. परीक्षा केंद्र परिसरात परीक्षार्थी वा अन्य कोणास शांततेस बाधा निर्माण होईल असे कृत्य करण्यास प्रतिबंध राहील. १०० मीटर परिसरातील झेरॉक्स केंद्र, पानटपरी, टायपींग केंद्र, एसटीडी बूथ, ध्वनीक्षेपक आदी आदेश मुदत संपेपर्यंत बंद राहतील. तसेच तेथे मोबाईल फोन, सेल्यूलर फोन, ई-मेल व इतर प्रसार माध्यमे घेऊन जाण्यास बंदी राहील. परीक्षा शांत, सुरळीत पार पाडण्यासाठी कोणतीही बाधा उत्पन्न करता येणार नाही. परीक्षा केंद्रावर कोणत्याही अनधिकृत व्यक्तीस, वाहनास प्रवेशासाठी मनाई राहील. परीक्षा केंद्रावर कार्यरत अधिकारी, कर्मचारी, परीक्षा केंद्रावर निगराणी करणारे अधिकारी व पोलीस अधिकारी,कर्मचारी यांना परीक्षेच्या अनुषंगाने हे आदेश लागू राहणार नाहीत.


Comments

Top