लातूर: लातूर तालुक्यातील मौजे निवळी येथे शासनाने मंजूर केलेल्या राष्ट्रीय पेयजल योजनेसह पाच कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचा शुभारंभ रविवार, १७ फेब्रुवारी रोजी दुपारी चार वाजता पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर आणि भाजपा नेते रमेशअप्पा कराड यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. या निमित्ताने त्यागमूर्ती प्रयागअक्का कराड आरोग्य सुरक्षा योजनेचे कार्डवाटप आणि भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. तरी हजारोच्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन जिप सदस्या प्रिती सुरज शिंदे, भाजपाचे लातूर तालुका अध्यक्ष विजय काळे यांनी केले आहे.
देशात, राज्यात आणि जिल्ह्यात भाजपाची सत्ता आल्यानंतर गावोगावच्या विकास कामांना गती मिळत असून निवळी जिल्हा परिषद मतदार संघात अनेक विकासाच्या योजना मंजूर झाल्या आहेत. निवळी गावासाठी ०१ कोटी ८२ लाखाची राष्ट्रीय पेयजल योजना कार्यान्वित होत असून या योजनेसह विविध रस्त्याचे डांबरीकरण, मजबुतीकरण, आरोग्य केंद्राची दुरुस्ती, सौर पंप, शिवाजी चौकाचे सुशोभिकरण, तांडा वस्ती सुधार योजना आदी पाच कोटी हून अधिक खर्चाच्या विकास योजनेचा शुभारंभ आणि निळकंठेश्वर मंदिरासमोरील सभामंडपाचा लोकार्पण सोहळा १७ फेब्रुवारी रोजी दुपारी ०४ वाजता जिल्ह्याचे पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर आणि भाजपाचे नेते रमेशअप्पा कराड यांच्या प्रमुख उपस्थितीत होत आहे.
विविध विकास कामाच्या शुभारंभ निमित्ताने यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने निवळी आणि परिसरातील कुटुंबांना याप्रसंगी त्यागमूर्ती प्रयागअक्का कराड आरोग्य सुरक्षा योजनेच्या कार्डचे वितरण करण्यात येणार असून याप्रसंगी भाजपा कार्यकर्त्यांचा मेळावाही आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमास भाजपाचे जिल्हाध्यक्ष नागनाथ निडवदे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मिलिंद लातूरे, उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, जिपचे बांधकाम सभापती प्रकाश देशमुख, समाज कल्याण सभापती संजय दोरवे, महिला व बालकल्याण सभापती सभापती संगीताताई घुले, कृषी व पशुसंवर्धन सभापती बजरंग जाधव, जिपचे गटनेते महेश पाटील, रेणापूर पंचायत समितीचे सभापती अनिल भिसे, संगायो लातूर तालुकाध्यक्ष साहेबराव मुळे, रेणापूरचे नगराध्यक्ष अभिषेक अकनगिरे यांच्यासह अनेक मान्यवर याप्रसंगी उपस्थित राहणार आहेत. निवळी गावातील आणि जिल्हा परिषद मतदार संघातील सर्व स्तरातील नागरिकांनी, भाजपाच्या कार्यकर्त्यांनी हजारोच्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन निवळी जिल्हा परिषदेच्या सदस्य सौ. प्रिती सुरज शिंदे आणि भाजपाचे लातूर तालुकाध्यक्ष विजय काळे यांनी केले आहे.
Comments