HOME   लातूर न्यूज

अंशकालीन कर्मचार्‍यांचे भजन आंदोलन

टाळ मृदंग वाजवित मागण्या पूर्ण करण्याचे सरकारला आवाहन


अंशकालीन कर्मचार्‍यांचे भजन आंदोलन

लातूर: लातूर जिल्हा पदवीधर अंशकलीन कर्माचारी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय लातूर येथे १२ फेब्रुवारी २०१९ पासून बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येत असून १३ फेब्रुवारी रोजी अर्धनग्न आंदोलन करण्यात आले. १६ फेब्रुवारी रोजी टाळ-मृदंगाच्या गजरात भजन आंदोलन करुन शासनाला जागे करण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसेच बलिदान दिलेल्या भारतीय सैनिकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली
गेल्या ११ डिसेंबर २०१८ रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये झालेल्या विशेष बाब व धोरणात्मक निर्णय या अनुषंगाने त्वरित परिपत्रक पारित करून अमलबजावणी करावी व पदवीधर अंशकालीन कर्मचार्‍यांना कंत्राटी पद्धतीने काम करण्याची संधी देण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी ही लढाई चालू आहे. ही लढाई जिंकल्याशिवाय रणांगण मोकळे करणार नाही. या लढाईत जिल्हाध्यक्ष संजय सूर्यवंशी, सचिव संपत गंगथडे, उपाध्यक्ष डी.एन.शिंदे, मुख्य संघटक विष्णू डोंजे, सहसंघटक हनुमंत क्षीरसागर, सहकोषाध्यक्ष, विश्वास कांबळे, सहकोषाध्यक्ष संजय तिगोटे, मांदळे एस.यू., सय्यद एन.एच.काजी इक्बाल, अनंत कुलकर्णी, मुसा जमादार, बालासाहेब केसकर, सतीश मदने, अंबादास साबने, उबाळे अरविंद, जाधव सूर्यकांत, प्रेमकांत ओहोळ, कांबळे देविदास, आदमाने मंदा, वैशाली शिंदे आदी सहभागी झाले होते.


Comments

Top