लातूर: आधुनिक लातूरचे शिल्पकार लोकनेते विलासराव देशमुख यांचा विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना येथे उभारण्यात आलेला पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण व लोकार्पण कार्यक्रम २४ फेब्रुवारी रोजी होणार आहे. या कार्यक्रमाच्या पुर्वतयारीसाठी काँग्रेस भवन, लातूर येथे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवार १८ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.३० वाजता बैठक होणार आहे.
विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना येथे उभारण्यात आलेल्या लोकनेते विलासराव देशमुख यांच्या पुतळयाच्या अनावरण कार्यक्रमास देशातील आणि राज्यातील मान्यवर नेते उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाच्या पुर्वतयारीच्या अनुषंगाने काँग्रेस भवन, लातूर येथे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेस कमिटी, महिला काँगेस कमिटी, युवक काँग्रेस कमिटी, काँग्रेस सेवा दल, काँग्रेस पक्षाचे सर्व सेल, युवा मंच, विविध संस्थाचे पदाधिकारी यांची बैठक होणार आहे.
दिलीपराव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवार १८ फेब्रुवारी २०१९ रोजी सकाळी १०.३० वाजता होणाऱ्या बैठकीस सर्व पदाधिकारी यांनी उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष ॲङ व्यंकट बेद्रे, शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष मोईज शेख, लातूर जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सुनिता आरळीकर, शहर महिला अध्यक्षा स्मिता खानापुरे, प्रदेश महिला सचिव सपना किसवे, अल्पसंख्यांक सेलचे जिल्हा अध्यक्ष रफिक शेख व सर्व तालुका काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांनी केले आहे.
Comments