रेणापूर: गोरगरीब वंचितासाठी आयुष्यभर संघर्ष करणारे लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या नावाने रेणापूर पंचायत समितीने बांधलेल्या सभागृहातून त्यांच्या भूमिकेला न्याय द्यावा. त्यांच्या विचारांची स्वप्नपूर्ती व्हावी अशी अपेक्षा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी रेणापूर येथे बोलताना व्यक्त केली.
रेणापूर पंचायत समितीच्या वतीने ३० लक्ष रुपये खर्च करुन ईमारतीच्या पहिल्या मजल्यावर सभागृह बांधण्यात आले आहे. या सभागृहाला लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांचे नाव देण्यात आले आहे. या सभागृहाचे उद्घाटन पालकमंत्री निलगेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार त्र्यंबक भिसे हे होते. याप्रसंगी लातूर ग्रामीण भाजपचे नेते रमेशअप्पा कराड, जिल्हा परिषद सभापती सौ. संगीता घुले, जि. प. सदस्य सुरेश लहाने, सुरेंद्र गोडभरले, पंचायत समिती सभापती अनिल भिसे, उपसभापती अनंत चव्हाण, रेणापूरचे नगराध्यक्ष अभिषेक आकनगिरे यांची प्रमुख उपस्थिती होती. माझ्यासारख्या लाखो कार्यकर्त्यांना मुंडे साहेबांनी संघर्ष करायला शिकवला. आज मी मंत्रिपदापर्यंत गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्यामुळेच पोहोचू शकलो. त्यांनी गोरगरीब जनतेसाठी आयुष्यभर संघर्ष केला. अशा या आदर्श नेत्याच्या विचारातून काम करीत आहे असे सांगून पालकमंत्री निलंगेकर म्हणाले की, विलासराव देशमुख आणि गोपीनाथराव मुंडे यांच्या मैत्रीचे दाखले देऊन अनेकांनी कामे करून घेतली. या मित्रांच्या नावाने आजपर्यंत कोणी काही केलं नाही. मात्र रेणापूर पंचायत समितीच्या माध्यमातून सभापती अनिल भिसे यांनी साहेबांच्या नावाने सभागृह बांधले. या सभागृहातून येत्या काळात गोरगरीब दीनदलित जनतेच्या हिताची कामे व्हावीत. पालकमंत्री म्हणून जिल्ह्यात काम करत असताना कोणत्याही तालुक्यावर अन्याय होणार नाही याची काळजी घेऊन जेजे विकासाचे असेल अशी कामे केली जात आहेत. केन्द्र आणि राज्य शासन सर्वसामान्यांना केंद्रबिंदू मानून काम करीत आहे. शेतकऱ्यांना विविध माध्यमातून मोठ्या प्रमाणात मदत केली जात असून आताच्या सरकारची पाच वर्ष आणि मागील सरकारची पंधरा वर्ष याचा प्रत्येकाने शासनाच्या माध्यमातून मिळालेल्या मदतीचा लेखाजोखा पाहिला तर दूध का दूध और पानी का पानी दिसून येईल. गोपीनाथराव मुंडे साहेबांमुळे रेणापूरची ओळख देशभर झाली असून या भागात त्यांच्यामुळेच विकासाची गंगा सुरू झाली असे सांगून या वेळी बोलताना भाजपा नेते रमेशअप्पा कराड यांनी रेणापूर तालुक्याला विकासाच्या माध्यमातून अधिकाधिक मदत करावी अशी मागणी पालकमंत्री यांच्याकडे केली. सभापती अनिल भिसे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. शेवटी गटविकास अधिकारी अभंगे यांनी आभार मानले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कक्ष अधिकारी भारत काळे यांनी केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस शहीद जवान आणि लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या कार्यक्रमास गटनेते रमेश सोनवणे, चंचला घुले, संध्या पवार, चंद्रकांत इंगोले, बयनाबाई साळवे, सतिष अबेकर, डॉ. बाबासाहेब घुले, वंसत करमुडे, ललिता काबळे, चंद्रकांत कातळे, राजकिरण साठे, श्रीकृष्ण जाधव, अनिल पवार, अभिजीत मद्दे, श्रीकृष्ण पवार, दिलीप पाटील, विजय चव्हाण, दत्ता सरवदे, संतोष चव्हाण, विठ्ठल कसपटे, मुन्ना गुरले, श्रीकृष्ण मोटेगावकर, श्रीमंत नागरगोजे, धनंजय म्हेत्रे, सुभाष रायनुळे यांच्यासह पंचायत समितीचे सदस्य, अधिकारी, कर्मचारी, भाजपाचे पदाधिकारी, लोकप्रतिनीधी व कार्यकर्ते मोठ्या संख्येनी उपस्थित होते.
Comments