लातूर: माजी राज्यमंत्री आमदार अमित देशमुख यांच्या संकल्पनेतून विलास सहकारी साखर कारखान्याच्या वतीने ऊस पाचट बेलर आणि ऊस तोडणी यंत्र प्रात्यक्षिक व सुशिक्षित बेरोजगार युवक मेळावा मंगळवार १९ फेब्रुवारी २०१९ रोजी सकाळी १० वाजता कासारजवळा येथे आयोजित करण्यात आला आहे.
लातूर तालुक्यातील कासारजवळा येथे होणाऱ्या यंत्र प्रात्यक्षिक व सुशिक्षित बेरोजगार युवक मेळावा कार्यक्रमास विलास सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन, माजी राज्यमंत्री, आमदार अमित देशमुख, कारखान्याच्या चेअरमन वैशालीताई देशमुख, लातूर ग्रामीणचे आमदार त्रयबंक भिसे, माजी आमदार वैजनाथराव शिंदे, जिल्हा परिषद सदस्य धीरज देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. विलास कारखाना वार्षिक सर्वसाधारण सभेत आमदार अमित विलासराव देशमुख यांनी दिवसेदिवस होणारा मजुरांचा तुटवडा आणि ग्रामीण भागातील बेरोजगार युवकासाठी उदयोग, व्यवसाय, रोजगार संधी उपलब्ध होण्यासाठी ऊसतोडणी यांत्रिकीकरणाची संकल्पना मांडली होती. या धोरणाचा एक भाग म्हणून लातुर तालुक्यातील कासारजवळा येथे ऊस पाचट बेलर आणि ऊस तोडणी यंत्र प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच युवकांसाठी स्वंयम उदयोग, व्यवसाय आणि रोजगार संधी बाबतीत मार्गदर्शन करण्यासाठी सुशिक्षित बेरोजगार युवक मेळावा आयोजित करण्यात आला आहे. हा प्रात्यक्षित कार्यक्रम आणि युवक मेळावा युवकासाठी एक नवी संधी ठरणार आहे.
माजी राज्यमंत्री आमदार संस्थापक चेअरमन अमित विलासराव देशमुख यांच्या संकल्पनेतून आणि विलास सहकारी साखर कारखान्याच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमास मंगळवार १९ फेब्रुवारी २०१९ रोजी सकाळी १० वाजता कासारजवळा ता. लातूर येथे हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन विलास सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने केले आहे.
Comments