लातूर: येथील अभिनव मानव विकास शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. चेतन सारडा यांना माहेश्वरी भूषण पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले. लातूर जिल्हा माहेश्वरी सभेचे जिल्हास्तरीय अधिवेशन रविवारी औसा येथील श्री केशव बालाजी देवस्थानच्या धर्म व संस्कार नगरीत संपन्न झाले. या अधिवेशनात डॉ. चेतन सारडा यांना त्यांच्या शैक्षणिक, वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल माहेश्वरी समाजभूषण पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर, माजी खा. रूपाताई पाटील निलंगेकर, उद्योजक हुकूमचंद कलंत्री, विभा गिल्डा, माहेश्वरीचे जिल्हाध्यक्ष राजकुमार पल्लोड, प्रदेशाध्यक्ष मधुसूदन गांधी, माहेश्वरीचे अखिल भारतीय प्रवक्ते रमेश परताणी, सभेचे जिल्हा सचिव सत्यनारायण हेड्डा, कोषाध्यक्ष फुलचंद काबरा, श्रीमती अलका सारडा, डॉ. सुजाता सारडा, डॉ. राखी सारडा, डॉ. विक्रम सारडा, माहेश्वरी सभेचे पदाधिकारी उपस्थित होते.
Comments