लातूर: आपण पत्रकार परिषद घेवून केलेल्या आरोपासंदर्भात कारवाई करण्याचा इशारा पालकमंत्र्यांनी दिला आहे. मी जनता व कामगारांच्या भल्यासाठी हे करतोय. माझी बाजू सत्याची आहे, त्यामुळे कारवाईला घाबरत नाही, कारवाईची वाट पाहत आहे, अशा शब्दात शिवसेना सहसंपर्क प्रमुख अभय साळुंके यांनी पालकमंत्र्यांना आव्हान दिले आहे.
साळुंके म्हणतात की, सध्या लातूर जिल्ह्यात चालू असलेला बांधकाम कामगारांना लाभांश व किट वाटपाचा कार्यक्रम १९९६ च्या कायद्यानुसार असताना, मी योजना तयार केली आणि राबवतोय असा खोटा प्रचार कामगार मंञ्यांनी करु नये. ०५ हजारांचा लाभांश सोबत वाटप केलेले सुरक्षा किट १० हजार रुपयांचे नसून, केवळ 2-3 हजारांचे आहे. प्रती कामगार ७ ते ८ हजार रुपये हडपण्याचं काम केलं गेलं आहे, असा आरोप मी पञकार परिषद घेउन केला होता. या आरोपावर मी आजही ठाम आहे. याची तक्रार आपण मुख्यमंञी आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे करणार आहे. कामगार मंञी संभाजी पाटील यांनी स्वतःचा खोटारडेपणा लपवत माझे आरोप खोटे असून कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. तशा बातम्या सर्व वर्तमान पञातून छापून आलेल्या आहेत. माझी लढाई सत्याची असून गरीबांना न्याय देण्यासाठी आहे, तसेच माझं नाव अभय आहे. मी गोर गरीबांसाठी लढत असताना, कोणालाही भित नाही. माझा उद्धेश हा भ्रष्टाचार कायद्या समोर आणणे हाच आहे. माझ्यावर कारवाई करणार असाल तर त्या निमित्ताने तुमचा सगळा घोटाळा कायद्यासमोर आणण्याची संधी उपलब्ध होईल. कामगारांची बाजू सक्षमपणे व पुराव्यानिशी न्यायालयासमोर मांडू. त्यामुळे अंतिम विजय हा माझाच होईल, अशी मला खाञी आहे. माझ्यावर कारवाई कराच मी तुमच्या कारवाईची वाट बघतोय. युती झाल्याच्या या वेदना असाव्यात असेही आपण म्हटले आहे. पण काही दिवस वाट पहा. युती झाल्याच्या वेदना तुम्हालाच होतील, असा इशाराही अभय साळुंके यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे.
Comments