लातूर: लातूर तालुक्यातील मौजे गादवड येथील सरपंच सौ. कौशल्याताई अण्णासाहेब कदम यांच्यासह अनेकांनी भाजपा नेते रमेशप्पा कराड यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. राज्यात आणि केंद्रात भाजपची सत्ता आल्यानंतर गल्लीपासून दिल्लीपर्यंत विविध स्तरावर, विविध विकासाची कामे मोठ्या प्रमाणात होत आहेत. लातूर ग्रामीणचे भाजपा नेते रमेशअप्पा कराड यांनी आमदार नसतानाही ग्रामविकास मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा करून लातूर ग्रामीण मधील जवळपास 70 गावच्या मूलभूत विकासासाठी तब्बल पाच कोटी रुपये एवढा मोठा निधी आणला आहे.
गावोगावच्या विकासासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे लातूर ग्रामीणचे भाजपा नेते रमेशअप्पा कराड यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत लातूर तालुक्यातील मौजे गाधवड येथील सरपंच सौ. कौशल्याताई अण्णासाहेब कदम, ग्रामपंचायत सदस्य मंगलताई गाडे, युवराज कदम, अण्णासाहेब कदम यांच्यासह अनेकांनी मंगळवारी लातूर येथे भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे. येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत गादवड गावातून भारतीय जनता पार्टीला प्रचंड मताधिक्य मिळवून देऊ अशी ग्वाही पक्ष प्रवेशानंतर सरपंच सौ. कदम यांनी दिली. यावेळी भाजपाचे लातूर तालुका अध्यक्ष विजय काळे सरचिटणीस बन्सी भिसे, श्याम वाघमारे, गटनेते भैरवनाथ पिसाळ, चंद्रकांत वागस्कर, बापूराव बिडवे, समाधान कदम, सुनील कदम, किशोर काटे, दत्ता भिसे यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.
Comments