लातूर: मतदानाची टक्केवारी वाढावी याकरिता जिल्हा निवडणूक प्रशासनाच्या वतीने स्विप अंतर्गत विविध जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, त्याअंतर्गत लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने भव्य सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते, त्यास उत्सर्फुत प्रतिसाद मिळाला. लातूर लोकसभा निवडणुक येत्या 18 एप्रिलला होणार असल्या कारणाने लातूर मनपा वतीने मतदार जनजागृतीपर भव्य अशा सायकल रॅलीचे नवीन जिल्हाधिकारी कार्यालय येथून सुरुवात झाली. सुरुवातीला जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, मनपा आयुक्त एमडी सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या हस्ते झेंडा दाखवून करण्यात आली. रॅलीमध्ये सातशेहून अधिक लोक आपली सायकल घेऊन रॅलीमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. यामध्ये लातूर मनपा अधिकारी-कर्मचारी, विद्यार्थी, शहरातील विविध संघटनाचे प्रतिनिधी, इतर शासकीय कार्यालयातील महिला कर्मचारी, आशा वर्कर, इत्यादीसह बहुसंख्य लोकांनी सहभाग नोंदवला. लोकशाही बळकट होण्याकरीता प्रत्येक मतदाराने मतदान करावे, त्यामध्ये जनजागृती व्हावी याकरीता सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रॅलीची सुरुवात नविन जिल्हाधिकारी कार्यालय येथून सुरुवात होऊन ०५नंबर चौक, बार्शी रोड, पाण्याची टाकी तेथून शिवाजी चौक मार्गे, अशोक हॉटेल येथून लातूर मनपा येथे समारोप करण्यात आला. यावेळी रॅलीमध्ये अतिरिक्त आयुक्त सतिश शिवणे, उपायुक्त संभाजी वाघमारे, सहाय्यक आयुक्त वसुधा फड, उज्वला शिंदे, दिलीप चिंदे, कल्लपा बामणकर, रमाकांत पिडगे, कलीम शेख, सुर्यकांत राऊत, संजय कुलकर्णी आदीसह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
Comments