लातूर: संच मान्यता प्रमाणे सेवाज्येष्ठता लक्षात न घेता सुवर्ण माता देशमुख प्राथमिक शाळा उदगीर येथील एका शिक्षकाला रुजू करुन घेण्यास टाळण्यात आले. अपॉइंटमेंट ही सेवाज्येष्ठतेनुसार न करता तिथे पैशाचा व्यवहार होऊन अपात्र व्यक्तीला रुजू केल्याचा आरोप एका शिक्षकाने केला आहे. या शाळेमध्ये पहिली ते सातवी पासून एकूण ०९ उपदाते मान्य आहेत. त्यापैकी पहिली ते चौथीची ०५ पदे १०० टक्के अनुदान अनुदानावर आहेत व पाचवी ते सातवी या वर्गातील तीन शिक्षक प्राथमिक पदवीधर असे एकूण चार अंशतः अनुदानित आहेत. त्या शिक्षकेतर अंशतः अनुदान २० टक्के आहेत. परंतु वीरेंद्र पाटील यांची नेमणूक ही आजपर्यंत झालेली नाही. १५ जानेवारी २००९ दिवशी त्यांनी ही संस्था रुजू केली होती पण अजूनही त्यांना वेतन मिळत नाही. असे निवेदन त्यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहे. लवकरात लवकर अनुदानित शिक्षक म्हणून कार्यरत करून घ्यावे अशी मागणी वीरेंद्र पाटील यांनी शिक्षण उपसंचालकांकडे केली आहे.
Comments