HOME   लातूर न्यूज

गंज गोलाई बाजार परिसरास शिस्त लावणार

पथ विक्रेता धोरणाचा करणार अवलंब- आयुक्त एमडी सिंह


गंज गोलाई बाजार परिसरास शिस्त लावणार

लातूर: शहर महानगर पालिकेच्या वतीने पथ विक्रेता धोरणाचे काम अतिंम टप्प्यावर असून काही दिवसताच गंज गोलाई बाजार परिसरास शिस्त लावण्याचे काम केले जाईल, त्या करिता दीनदयाल अंत्‍योदय योजना राष्‍ट्रीय नागरी उपजिविका अभियानाअंतर्गत नागरी पथविक्रेत्‍यांना सहाय्य या करीता विभाग कार्यरत आहे, त्यांनी त्वरित गोलाई परिसराची पाहणी करून अहवाल सादर करावे अशा सूचना मनपा आयुक्त एमडी सिंह यांनी केल्या.
लातूर शहरातील सर्व पथविक्रेताना सर्वेक्षणामध्‍ये सहभागी होऊन आपली नोंदणी करण्‍याचे आवाहन लातूर शहर महानगरपालिकेच्‍या वतीने करण्‍यात आले होते, त्यात शहरातील बहुसंख्य पथ विक्रेत्यांनी सर्वेक्षण करून घेतले आहे, शहरामधील पथविक्रेत्‍यांना त्‍यांची शैक्षणिक पात्रता, मर्यादित कौशल्‍य व आर्थिक पत यामुळे व्‍यवसायाच्‍या संधी कमी उपलब्‍ध असतात, यामुळे असंघटित आणि स्‍वंयरोजगार करणा-या पथविक्रेत्‍यांना व्‍यवसायाच्‍या व्‍यापक संधी उपलब्‍ध करून देणे, त्‍यांना कार्यकुशल बनविणे त्‍यांना पत मिळविण्‍यास समर्थ बनविणे तसेच त्‍यांची व त्‍यांच्‍या कुटूंबांची सामाजिक सुरक्षितता, सामाजिक कल्‍याण व शासकीय योजनांशी सांगड घालणे व त्‍यांचे जीवनमान उंचावणे यासाठी सर्वेक्षण करून लाभ देणेकरीता शहर अभियान व्‍यवस्‍थापन कक्षाची स्‍थापना करण्‍यात आली आहे. कक्षाच्या वतीने वरील प्रमाणे सोयीसुविधा पथविक्रेत्‍यांना देण्यात येणार आहेत. पथविक्रेता सर्वेक्षण मोबाईल अॅपव्‍दारे लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने करण्‍यात येत आहे त्याची व आता पर्यंत झालेल्या कामाची माहिती आयुक्त एमडी सिंह यांनी घेतली. त्यानुसार शहर अभियान व्यवस्थापक समीर मुलाणी यांना सदरील कामाची पाहणी करून त्वरित अहवाल सादर करण्यास सांगितले, त्यानुसार पथ विक्रेता समितीच्या सदस्यासोबत पाहणी करण्यात आली. यावेळी गौस गोलंदाज, बाबुराव काळदाते, सायरा शेख त्र्यंबक स्वामी आदीसह बहुसंख फेरीवाले उपस्थित होते. प्राथमिक स्वरूपात गंज गोलाई परिसरामध्ये पथ विक्रेत्यांना बसविण्याची सुविधा करण्यात येणार आहे, त्या मध्ये त्यास नाममात्र शुल्क आकारणी करण्यात येणार असून ११ महिन्यांकरिता दर निश्चित करण्यात येणार आहेत, सर्वेक्षणात सहभागी झहालेल्या पात्र पथ विक्रेत्यास पुढील काळानुसार दर वाढविणे , सदरील जागा त्याच पथ विक्रेत्यास देणे याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे, लवकरच गंजगोलाई परिसरास शिस्त लागणार आहे, बाजारपेठेत होणार्‍या अतिक्रमणापासून गोलाई मोकळा श्वास घेणार आहे, असे आयुक्त एमडी सिंह यांनी कळविले आहे.


Comments

Top