लातूर: महाराष्ट्र राज्याच्या स्थापना दिनानिमित्त जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्या हस्ते बाभळगाव येथील पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण व राष्ट्रध्वजास मानवंदना देण्यात आली. यावेळी महापालिका आयुक्त एमडी सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विपीन इटनकर, पोलिस अधिक्षक राजेंद्र माने, अपर जिल्हाधिकारी अविनाश पाठक, जिल्हा परिषद अध्यक्ष मिलींद लातूरे, महापौर सुरेश पवार, जिल्हा परिषद उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, निवासी उपजिल्हाधिकारी अनंत गव्हाणे, उपजिल्हाधिकारी सुनील यादव, प्रदीप कुलकर्णी यांच्यासह इतर शासकीय विभागप्रमुख व अधिनस्त अधिकारी, कर्मचारी तसेच स्वातंत्र्य सैनिक, जेष्ठ नागरिक, विद्यार्थी, पालक व पत्रकार उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी महाराष्ट्र राज्याच्या वर्धापन दिनानिमित्तच्या समारंभास उपस्थित स्वातंत्र्य सैनिक, जेष्ठ नागरिक, लोकप्रतिनिधी, अधिकारी- कर्मचारी, विद्यार्थी, पालक व पत्रकार यांना शुभेच्छा दिल्या. तर देशाच्या प्रगतीत महत्वाचा वाटा उचलणाऱ्या सर्व कामगारांना ही कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. जिल्हाधिकारी श्रीकांत यांच्या हस्ते ध्वजारोहण होऊन राष्ट्रध्वजास मानवंदना देण्यात आली. त्यानंतर परेड कमांडर पोलिस उपअधिक्षक सचिन सांगळे यांच्या समवेत जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी परेडचे निरीक्षण केले. त्यानंतर परेडचे संचलन झाले. पथ संचलनात एक परेड कमांडर, एक सेकंड इन कमांडर, आठ पॅलटून व २३० जवानांनी सहभाग घेतला. जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी ध्वजारोहण कार्यक्रमास उपस्थित आदरणीय स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिक व इतर मान्यवरांची भेट घेऊन सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर विद्यार्थ्यांचे देशभक्तीपर गायन झाले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन उध्दव फड यांनी केले.
Comments