लातूर: जागतिक वसुंधरा दिनाच्या निमित्ताने लातूरच्या पूर्व भागात वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धनाबाबत कार्यक्रम व बैठकीचे आयोजन करण्यात आले. लातूर वृक्ष, यशवंत विद्यालय, जिजामाता विद्यालय, व स्थानिक रहिवाशी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम डॉ. गोपाळराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. या कार्यकमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लातूर वृक्षचे समन्वयक सुपर्ण जगताप, डॉ गणेश पन्हाळे, डॉ सुरेखा गरड, डॉ नीलम जाधव पन्हाळे, डॉ भास्कर बोरगावकर, पक्षीमित्र मेहबूब चाचा, डॉ गरड, मुख्याध्यापिका देशमुख उपस्थित होते.
या कार्यक्रमात जागतिक वसुंधरा दिनाचे औचित्य साधून पिंपळाचे दोन वृक्ष लावण्यात आले. कमी वेळेत आयोजन करुन १००-१२५ हून अधिक जण वृक्ष चळवळीच्या बैठकीला आणि वृक्षारोपणाला उपस्थित होते. जागतिक वसुंधरा दिनानिमित्त लातूर शहर हरित व सुंदर करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. जवळपास १०० जणांनी किमान ०५ वृक्ष जगवू हा संकल्प केला.
Comments