लातूर: शहरातील पारंपारिक पध्दतीचे पथदिवे बदलून एलईडी पथदिवे बसविणे बाबत लातूर शहर महानगरपालिकेने भारत सरकारच्या ईईएसएल कंपनी सोबत करारनामा केलेला आहे. या करारनामानुसार पहिल्या टप्प्यामध्ये पांरपारिक पध्दतीच्या पथदिव्यांपैकी ९५ % पथदिवे बदलून त्याएवजी १८ वॅट ४५ वॅट ७० वॅट व ११० वॅटचे एलईडी बसवून काम पूर्ण केले आहे. दुसर्या टप्प्यामध्ये मनपाने बसवलेले बंद एलईडी व रिकाम्या पोलवर पथदिवे बसवण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. तसेच पथदिवे चालू-बंद करण्यासाठी व पथदिवे दुरूस्तीसाठी अद्यावत CCMS चे काम हाती घेण्यात येणार आहे. नवीन बसवण्यात आलेल्या एलईडी पथदिव्यांपैकी कांही पथदिवे बंद पडल्याबाबत आलेल्या तक्रारीबाबत निर्णय घेण्याकरिता आयुक्त एमडी सिंह यांनी ईईएसएल कंपनीचे इंजिनिअर्स यांच्या सोबत बैठक घेतली. या बैठकीमध्ये झोननिहाय पथदिवे दुरूस्तीकरिता व नागरीकांना तक्रार दाखल करण्याकरिता सक्षम यंत्रणा व टोल फ्री नंबर उपलब्ध करून देण्याकरिता आदेश देण्यात आए. विजेची बचत करण्याकरिता वेळेत पथदिवे चालु-बंद करण्याकरिता मनपा कर्मचार्यांना आदेश देण्यात आले. पावसाळ्यामध्ये पथदिवे बंद पडु नयेत यासाठी आवश्यक उपाययोजना केली जाणार आहे. या बैठकीला उपायुक्त संभाजी वाघमारे, शहर अभियंता दिलीप चिद्रे, विभाग प्रमुख ताकपिरे जेएम व ईईएसएल कंपनीचे इंजिनिअर शिवय्या उपस्थित होते.
Comments