लातूर: अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटी सचिव, माजी राज्यमंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांची शुक्रवार दि. ३ मे २०१९ रोजी बाभळगाव निवास्थान, या ठिकाणी लातूर व परिसरातील नागरिक, विविध संस्था, संघटनांचे पदाधिकारी, प्रतिनिधी यांनी भेटी घेतल्या. या प्रसंगी आमदार देशमुख यांनी त्यांच्या समस्या समजून घेतल्या. त्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या विविध कार्यक्रमांची निमंत्रणे स्विकारली. जनतेच्या समस्या व अडचणी सोडविण्याबाबत संबंधितांना आवश्यक त्या सूचना दिल्या.
आज सकाळी बाभळगाव निवासस्थानी अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटी सचिव, माजी राज्यमंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांची लातूर जिल्हा धर्मादाय संस्था सामुहिक विवाह समितीचे आयोजक, महात्मा बसवेश्वर सार्वजनिक जयंती समितीचे पदाधिकारी, उदगीर बौद्ध धर्मीय सामुदायिक मंगल परिणय सोहळा समिती पदाधिकारी, एरोबिक फिटनेस राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग घेऊन यशस्वी झालेले विदयार्थी, कदम हाईट्स या नूतन शैक्षणिक संकुलाचे पदाधिकारी, तसेच विविध संस्थेचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी आमदार देशमुख यांची भेट घेतली. यावेळी आमदार देशमुख यांनी त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी मांडलेल्या अडचणी संदर्भात संबंधिताना कार्यवाही करण्याची सूचना केली.
आमदार देशमुख यांची बाभळगाव येथे जिल्हा धर्मादाय संस्था सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजक अध्यक्ष रमेश बियाणी, समितीचे सदस्य जगन्नाथ पाटील, विशाल लाहोटी, अजिंक्य सोनवणे, अशोक भोसले, अँड.संगमेश्वर पाटील, महात्मा बसवेश्वर जयंती उत्सव समितीचे किरण खोबरे, प्रशांत खोबरे, राजू पाटील, मुकेश उटगे, जगदीश येरटे, अभिजीत पतंगे, वयकंटेश पूरी, कदम हाईट्स या नूतन शैक्षणिक संकुलचे विवेक कदम पाटील, सौ.कलावती कदम पाटील, धनंजय देशमुख, डॉ.राजकुमार दाताल, राष्ट्रीय प्रशिक्षक सोहेल शेख, एरोबिक फिटनेस राष्ट्रीय स्पर्धेतील विजेते अंकिता काळे, रुपाली तट, पठाण नर्गिस, पूजा येलगट्टे, मेघा दरक, उदगीर बौद्ध धर्मीय सामुदायिक मंगल परिणय सोहळा समितीचे पप्पू गायकवाड यांच्या सह पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.
(तुमच्या प्रतिक्रिया द्या aajlatur@gmail.com वर. अतिशय कमी खर्चात प्रायोजकत्वही मिळवू शकता, कॉल 9922612300)
Comments