HOME   लातूर न्यूज

व्यवसाय अभ्यासक्रमासाठी अर्ज करण्यास मुदतवाढ

व्यवसाय शिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमासाठी अर्ज करण्यास मुदतवाढ


व्यवसाय अभ्यासक्रमासाठी अर्ज करण्यास मुदतवाढ

लातूर: महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध व्यवसायिक अभ्यासक्रमासाठी दरवर्षी इच्छूक मान्यताप्राप्त संस्थाकडून नविन मान्यता/ नुतनिकरण देण्यासाठी अर्ज मागविण्यात येतात. शैक्षणिक वर्ष २०१९-२० साठी मंडळाचे अभ्यासक्रम राबविण्यास इच्छुक असलेल्या नोंदणीकृत संस्था/ व्यवस्थापनांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आलेले आहेत. व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या http:/vti.dvet.govin या संकेत स्थळावर भेट देऊन इच्छुक संस्थाना ऑनलाईन अर्ज करता येईल.
मंडळाच्या अभ्यासक्रमासाठी नव्याने अर्ज करण्याची अंतिम मुदत दिनांक ३० एप्रिल २०१९ होती ती वाढवून दिनांक १५ मे २०१९ पर्यंत करण्यात आली आहे व नुतनीकरणासाठी online अर्ज करण्याची अंतिम तारीख १५ जून २०१९ आहे, असे जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी एस.बी. वाघमारे यांनी कळविले आहे.


Comments

Top