लातूर: येथील श्री महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेच्या कार्यकारी मंडळाच्या निवडणूकीत अध्यक्षपदी शिवशंकर बिडवे व उपाध्यक्षपदी माजी आमदार सिना आलुरे गुरुजी विजयी झाले. या बिडवे पॅनलचे अन्य सर्व सदस्यही निवडून आले. महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेची वर्षाभरापूर्वीच निवडणूक झाली होती. परंतू विरोधकांनी तांत्रिक मुद्दयावर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. यावर खंडपीठाने सुनावणी घेऊन पुन्हा संस्थेच्या कार्यकारी मंडळाची निवडणूक घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार ०५ मे २०१९ रोजी देशिकेंद्र विद्यालयात निवडणूक घेण्यात आली. बिडवे यांच्या पॅनलमधून अध्यक्षपदासाठी शिवशंकर बिडवे, उपाध्यक्षपदासाठी आलुरे गुरुजी, सदस्यात्वासाठी काशिनाथ साखरे, मन्मथ येरटे, प्रभुप्पा पटणे, शिवशंकर खानापूरे, बसवेश्वर बिडवे व सुभाषचंद्र मांडे विजयी झाले. गिरवलकर यांच्या पॅनलमधून अध्यक्षपदासाठीचे उमेदवार सांबप्पा गिरवलकर, उपाध्यक्षपदासाठी माधवराव पाटील चिंचोलीकर, सदस्यत्वासाठी राजेश्वर पाटील, अशोक उपासे, ललिता पांढरे, चनबसप्पा डगवाले, बाबुराव तरगुडे व कांतराव बुके यांना पराभव पत्कारावा लागला. या निवडणुकीत एकूण ४४ मतदार होते. त्यापैकी ४३ जणांनी मतदानाचा हक्क बजावला. बिडवे पॅनलला २८ व गिरवलकर पॅनलला १५ मते मिळाली. बिडवे पॅनल १३ मत्ताधिक्याने विजयी झाले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून बीड येथील सहाय्यक धर्मादाय आयुक्त एसव्हीएच कादरी यांनी काम पाहिले. निवडणुकीतील विजयानंतर बिडवे पॅनलमधील सर्व विजयी उमेदवारांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे सभासद मन्मथप्पा लोखंडे, शिवाप्पा अंकलकोटे, विजयकुमार रेवडकर, अभिमन्यू रासूरे, सिद्धेश्वर करजगे, अनिल कोरपे, बाबुराव मैंदरगीकर, दिलीप तमशेट्टी, डॉ. महेश हलगे, डॉ. शंकर हुरणे, जगदीश बिडवे, बसवंत भरडे, विरभद्र वाले, चंद्रशेखर स्वामी, शैलेश स्वामी, भीमाशंकर बेंबळकर, डॉ. साखरे, सुरेश दोशट्टी, बाबुप्पा सोलापुरे, काशीनाथ भरडे, प्रभूराज इंडे, धुळाप्पा आरबळे, नागेश उटगे, सय्यद, खाजा शेख आदी उपस्थित होते.
Comments