HOME   लातूर न्यूज

विवेकानंद कॅन्सर हॉस्पिटलच्या रूग्णसेवा सदनाचे भूमीपूजन

रूग्णसेवा सदनाचा उपक्रम कौतुकास्पद- अमित देशमुख


विवेकानंद कॅन्सर हॉस्पिटलच्या रूग्णसेवा सदनाचे भूमीपूजन

लातूर: कर्करोग रूग्णाच्या नातेवाईकासाठी लोकसहभागातून उभारण्यात येणाऱ्या रूग्णसेवा सदनाचा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस सचिव, माजी राज्यमंत्री, आमदार अमित देशमुख यांनी म्हटले, ते विवेकानंद कॅन्सर हॉस्प्टिलच्या रूग्णसेवा सदनाच्या भूमीपूजन प्रसंगी बोलत होते. विवेकानंद मेडीकल फाऊंडेशन अँड रिसर्च सेंटरच्या माध्यमातून लातूर एमआयडीसी भागात असलेल्या विवेकानंद कॅन्सर हॉस्पिटल मध्ये १५० रूग्णाच्या नातेवाईकाकरीता रुग्णसेवा सदन येत्या वर्षभरात उभारले जात आहे. या सदनाचा भूमिपूजन समारंभ हावरे ग्रुपचे सुरेश हावरे यांच्या हस्ते व डॉ.अशोक कुकडे आणि आमदार अमित देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी कैलास शर्मा, मकरंद जाधव, डॉ. अरूणा देवधर, खासदार सुनिल गायकवाड, प्रभाताई गोरे, लक्ष्मीकांत कर्वा, योगेश कर्वा आदी उपस्थित होते.
आमदार देशमुख म्हणाले, समाजाच्या योगदानातून सुरू होणारा हा प्रकल्प असुन यामुळे गरजू रुग्णांना नक्कीच मदत होईल असे सांगून कर्करोग रूग्णाच्या नातेवाईकासाठी लोकसहभागातून उभारण्यात येणाऱ्या रूग्णसेवा सदनाचा सेवाभावी उपक्रम कौतुकास्पद आहे. कार्यक्रम प्रसंगी सेवासदनास लोकसहभागासाठी आर्थिक व अन्यरूपाने मदत करणाऱ्या मधुसुदन भुतडा, निलेश ठक्कर, डॉ.आनंद गोरे, राजस्थानी महिला मंडळ, नंदकीशोर अग्रवाल, चैतन्य भार्गव, बीबी ठोबरे, विश्वास कुलकर्णी, प्रकाश कवळेकर, आण्णाराव पाटील आदींचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन शिवराज मिटकरी यांनी तर आभार मकरंद जाधव यांनी मानले.


Comments

Top