लातूर: लातूर शहराला आठ दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा प्रयत्न केला जाईल असं मनपाच्या आढावा बैठकीत सांगण्यात आलं. ही आढावा बैठक महापौर सुरेश पवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. यावेळी विविध विषयावर चर्चा करण्यात आली. यावेळी आयुक्त एमडी सिंह, उपमहापौर देविदास काळे, शैलेश गोजमगुंडे उपस्थित होते. लातूर शहराला लागणारे पाणीए पुरेसे मिळत नाही. दहा दिवसाआड होणारा पुरवठा त्रासदायक आहे. याकरिता मनपा आयुक्त यांनी महापौर सुरेश पवार यांच्या अध्यक्ष तेखाली त्यांच्या दालनात आढावा बैठक घेण्यात आली. येवेळी उपस्थित सदस्याना पाणी पुरवठा विषयक अडचणी काय आहेत ते मांडण्यास सांगितले व त्यावर चर्चा करण्यात आली. केंद्र शासन पुरस्कृत अमृत अभियानांतर्गत लातूर शहर पाणी पुरवठा योजनेच्या कामांचा आढावा घेण्यात आला. शहराला दहा दिवसाआड होणारा पाणी पुरवठा आठ दिवसावर आणा याची मागणी सत्ताधारी व विरोधी सदस्यांनी केली. शहरातील ०३ मोठ्या टाक्यांवर वॉल्व बसविण्याची कार्यवाही येत्या गुरुवारपर्यंत पूर्ण करून घेण्याचे आदेश आयुक्तांनी दिले. यामुळे मोठ्या प्रमाणात होणारी पाणी गळती थांबू शकते. शहरातील सर्व घरगुती व व्यावसायिक इमारतींचे जलपुनर्भरण करणे आवश्यक आहे त्याकरिता सर्व कर्मचाऱ्यांसहित सदस्यांनीही प्रयत्न करावे, नळाला तोट्या बसविण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत आदी विषयवार चर्चा करण्यात आली. यावेळी लातूर शहर महानगरपालिकेचे उपायुक्त संभाजी वाघमारे, केए बामणकर, शेलेश स्वामी, कैलास कांबळे, श्वेता लोंढे, शोभा पाटील, सपना किसवे, इम्रान सय्यद, चंद्रकांत बिराजदार, व्यंकट वाघमारे, वर्षा कुलकर्णी, स्वाती घोरपडे, गुरुनाथ मगे, दीप्ती खंडागळे आदीसह इतर नगरसेवक, अधिकारी उपस्थित होते.
Comments