HOME   लातूर न्यूज

मोहन महाराजांचा देहदान संकल्प

समाजानेही या दिव्य विचाराचा अवलंब करावा- डीन राजाराम पोवार


मोहन महाराजांचा देहदान संकल्प

लातूर: माणसं समाजाचं काहीतरी देणं लागतं या उदात्त हेतूने जीवंतपणी सत्कार्य करत असतात, पण नश्‍वर देहाचा मरणानंतरही रुग्णाला माहिती होण्यासाठी तसेच वैद्यकीय शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना आपले मृत शरीर हे मातीमध्ये नष्ट करणे, अग्नी देवून नष्ट करण्यापेक्षा ते समाजाला उपयोगी पडावे हा दिव्य विचार करत असतात, त्याच भावनेने मोहन महाराज खंडेलवाल यांनी मरणोत्तर देहदान संकल्प अर्ज भरुन देवून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे, समाजानेही अशा दिव्य विचारांचा अवलंब करावा, असे आवाहन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजाराम पोवार यांनी केले. लातूर येथील श्री संतोषीमाता भक्त मोहनलाल मुकुंदलाल खंडेलवाल महाराज यांनी आपल्या ६९ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून मरणोत्तर देहदानाचा संकल्प सोडला, तसा फॉर्मही भरुन सादर केला. यावेळी सदिच्छा देताना अधिष्ठाता डॉ.पोवार बोलत होते. मोहन महाराज यांनी आजपर्यंत शतकी रक्तदान करुन समाजापुढे आदर्श ठेवला आहे, आता आणखी एक पाऊल पुढे जावून त्यांनी मरणोत्तर देहदान करत समाजापुढे उदात्त भावना ठेवली आहे, समाजानेही त्यांचा आदर्श घ्यावा असे आवाहन करुन डॉ. पोवार यांनी मोहन महाराजांच्या वाढदिवसाचे अभिष्टचिंतन केले. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे शरीरशास्त्र विभाग प्रमुख डॉ. मंगेश सेलूकर, पत्रकार बाळ होळीकर, नितीन चालक व इतर वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.


Comments

Top