लातूर: जिल्ह्यातील देवणी तालुका सर्वात जास्त टंचाईग्रस्त आहे. या तालुक्यातून देव नदी जाते मात्र पावसाळा संपल्यानंतर या नदीमध्ये पाण्याचा थेंबही थांबत नाही. आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून २०१३ पासून महाराष्ट्रामध्ये नदी पुनरुज्जीवन प्रकल्प राबवीला जात आहे. २०१४ पासून आतापर्यंत महाराष्ट्रातील नद्यांचे ४१ नद्यांचे पुनर्जीवनचे काम करण्यात आले आहे. आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते रविशंकर यांच्या प्रेरणेतून नद्यांचे पुनर्जीवनचे काम हाती घेण्यात आले आहे. देवणी तालुक्यातील देवर्जन पासून तालुक्यात या नदीची लांबी साधारणपणे तीस किलोमीटर आहे. या वर्षी नागराळ गावातील नदीच्या कामाची सुरुवात आर्ट ऑफ लिव्हिंगच्या नदी पुनर्जीवन प्रकल्पाच्या माध्यमातून करण्यात आली. या प्रसंगी बसवराज पाटील नागराळकर व गावकरी मोठ्या संखेने उपस्थित होते. आर्ट ऑफ लिव्हींगचे नदी पुनर्जीवन प्रकल्प समन्वयक महादेव गोमारे, देवणी तालुका समन्वयक नागेश जिवने, नरवडे हे उपस्थित होते. या वर्षी नागराळ गावात मोठ्या प्रमाणामध्ये लोकचळवळीतून जलस्रोतांच्या पुनर्जीवनाचे कामे करण्यात येत आहेत. या नदीचे काम केल्यामुळे गावाला पिण्यासाठी व शेतीसाठी पाणी उपलब्ध होणार आहे.
Comments