लातूर: तालुक्यातील तांदूळजा गावात सध्या तीव्र पाणीटंचाई जाणवत असून येथील ग्रामसेवकांचे पद रिक्त असल्यामुळे गावातील सर्वच समस्यांनी गंभीर स्वरूप धारण केले आहे. गावकर्यांच्या समस्या सोडविण्यासाठी माजी राज्यमंत्री आमदार अमित देशमुख यांनी लक्ष घालावे, अशी मागणी ग्रामस्थांनी एका निवेदनाद्वारे केली आहे. गावातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी जैन समाजाच्या वतीने एक टँकर सुरु करण्यात आले आहे. शिवाय एका कुपनलिकेचे अधिग्रहण करण्यात आले आहे. आणखी कुपनली्कांचे अधिग्रहण करणे आवश्यक आहे, परंतू गावासाठी ग्रामसेवकच नसल्यामुळे बऱ्याच अडचणी येत आहेत असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. या यासंदर्भात आमदार अमित देशमुख यांच्या कार्यालयातून पाठपुरावा केला असता, दोन दिवसात ग्रामसेवकाची नियुक्ती होईल शिवाय, गावातील इतर समस्यांवरही तोडगा काढला जाईल असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले आहे.
Comments