HOME   लातूर न्यूज

काश्मिरातील चार तरुण लातूर एटीएसच्या जाळ्यात

आयसिसच्या प्रवेशामुळे सगळेकडे सतर्कता, स्लिपर सेलचे सद्स्य असण्याची शक्यता


काश्मिरातील चार तरुण लातूर एटीएसच्या जाळ्यात

लातूर: जम्मू-काश्मिर राज्यातील चार तरुण लातूर जिल्ह्यातील काही भागात संशयास्पदरित्या फिरत होते. लातूरच्या दहशतवादविरोधी कक्षाचे प्रमुख कैलाश डाबेराव यांना एका खबर्‍यामार्फत मिळालेल्या माहितीनुसार तात्काळ यंत्रणा सज्ज करुन दहशतवादविरोधी पथकासह अहमदपूर शहरात दाखल झाले आणि तीन तरुण संशयास्पदरित्या फिरत असल्याचे आढळून आले. त्यांना ताब्यात घेत उदगीर शहरातुनही एका तरुणास अटक करण्यात आली. ’इसिस’ या दहशदवादी संघटनेचा जम्मू-काश्मिर राज्यात झालेल्या प्रवेशाचे वृत्त पाहता देशभरातील तपास यंत्रणा लक्ष ठेवून आहेत. जम्मू-काश्मिरच्या मिळून आलेल्या या संशयीतामुळे मराठवाड्यासह राज्यातील काही भागात अलर्ट जारी करण्यात आला आहे. ज्या मध्ये नांदेड, लातूर, औरंगाबाद, पुणे मालेगाव या शहरांचा समावेश आहे. अटक करण्यात आलेल्या चारही संशयिताबद्दल दहशवाद्यांसाठी स्लिपर सेल म्हणून काम करत असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या प्रकरणाचा अधिक तपास करण्यासाठी नांदेड एटीएसचे पथक लातूरात दाखल झाले असून या चौघांचीही कसून चौकशी करण्यात येत आहे.
या घटनेमुळे राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या दिल्ली येथील वरिष्ठ अधिकार्‍यांनी राज्यातील एटीएस आणि गुप्तचर विभागाला दक्षतेच्या सूचना दिल्या आहेत. राज्यात दहशतवादी संघटना सक्रीय झाल्या आहेत, त्यात आयसिस या संघटनेच्या वतीने मोठ्या प्रमाणात स्लिपर सेल तयार करण्यात येत असून यामध्ये पुरुषांसह महिलांचाही समावेश असल्याची भिती वर्तविण्यात येत आहे. काश्मिर खोर्‍यातील बंडखोर संघटनांना हाताशी धरुन त्या भागातील तरुणांना विशेष प्रशिक्षण देऊन देशभरातील विविध शहरात पाठविण्यात येत आहे. तर भिकार्‍यांच्या वेशात फिरणारे हे लोक धार्मिक आणि सार्वजनिक ठिकाणी मोठा दहशतवादी हल्ला करण्याची शक्यता दिल्ली येथील एनआयएच्या गुप्तचर विभागाने एटीएस प्रमुख अतुलचंद्र कुलकर्णी यांना मेलद्वारे कळविली आहे.


Comments

Top