लातूर: आवर्तन प्रतिष्ठानच्या वतीने औरंगाबाद येथील विख्यात युवा भरतनाट्यम नृत्यांगना मृगनयनी भगिनी कुमारी इशिता व कुमारी ईशानी यांच्या भरतनाट्यम् कार्यक्रमाचे आयोजन १८ मे २०१९ रोजी सायंकाळी साडेसहा वाजता अष्टविनायक मंदिराच्या गणेश हॉल येथे करण्यात आले आहे. मराठवाड्यातील विख्यात युवा भरतनाट्यम नृत्यांगना मृगनयनी भगिनी कुमारी इशिता व ईशानी या दोघीही भगिनी भरतनाट्यम क्षेत्रातचे प्रसिद्ध गुरु व्ही. सौम्यश्री, औरंगाबाद यांच्या शिष्या आहेत. इशिता व ईशानी यांना अनेक पुरस्कारही प्राप्त झालेले आहेत. दोघींचेही भरतनाट्यम नृत्य प्रकारातील अरंगेत्रम झालेले असून अनेक प्रतिष्ठित व्यासपीठांवरून या दोघींनी मृगनयनी भगिनी या नावाने नयन्यरम्य कलाविष्कार सादर करत आहेत.
लातूर येथील आवर्तन प्रतिष्ठानच्यावतीने मागील तब्बल ४९ महिन्यांपासून लातूर शहरात अभिजात शास्त्रीय संगीताच्या प्रचार व प्रसारासाठी सातत्याने गायन वादन व नृत्य कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे. याच नाविन्यपूर्ण व ऐतिहासिक उपक्रमाला लातूरकर रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहेच. अवर्तच्या याच उपक्रमा अंतर्गत हा नृत्याविष्कार सादर केला जाणार आहे. या महिन्यांमध्ये आवर्तन प्रतिष्ठान आपले अर्धशतक पूर्ण करत असून लवकरच आपला सुवर्णमहोत्सवी संगीत सभा आवर्तन प्रतिष्ठानच्यावतीने साजरी करण्यात येणार आहे. या पन्नासाव्या मासिक संगीत सभेसाठी आपण सर्व रसिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन आवर्तन प्रतिष्ठानच्यावतीने करण्यात आले आहे.
Comments