HOME   लातूर न्यूज

’विवेकीयांची संगती’ चे उद्या प्रकाशन

देऊळगावकरांचे नवे पुस्तक, सुधीर कक्कर, दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी करणार प्रकाशन


’विवेकीयांची संगती’ चे उद्या प्रकाशन

लातूर: ज्येष्ठ पत्रकार तथा आंतरराष्ट्रीय पर्यावरणतज्ञ अतूल देऊळगावकर लिखित ’विवेकीयांची संगती’ या पुस्तकाचे प्रकाशन पुणे येथील बीएमसीसी रस्त्यावरील गोखले इन्स्टिट्यूटच्या काळे सभागृहात संपन्न होणार आहे. या पुस्तकाचे प्रकाशन पुण्याच्या मनोविकास प्रकाशनच्या वतीने करण्यात येणार आहे. दिनांक १८ मे रोजी सायंकाळी ६.०० वा. ज्येष्ठ मनोविश्लेषक व सांस्कृतिक मानसशास्त्रज्ञ डॉ. सुधीर कक्कर आणि दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांच्या हस्ते या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा होणार असल्याची माहिती मनोविकास प्रकाशचे संस्थापक अरविंद पाटकर यांनी दिली आहे. जात,धर्म,वर्ग,लिंग या सर्व भेदांच्या पलिकडे जाणारा सुसंस्कृत व विवेकी समाज घडविण्यासाठी आयुष्य वेचलेल्या धुरिणांविषयीची कृतज्ञता लेखक अतूल देऊळ्गावकर यांनी आपल्या ’विवेकीयांची संगती’ या पुस्तकातून व्यक्त केली आहे. या पुस्तकात अर्थतज्ञ अमर्त्य सेन, कृषीतज्ञ डॉ. नॉर्मन बोरलॉग, सत्यजित राय, मृणाल सेन, लॉरी बेकर, कुमार गंधर्व, व्यंगचित्रकार केशव आणि सुरेंद्र, डॉ. सुधीर कक्कर, कुमार केतकर, प्रा. भागवतराव धोंडे, जयंत वेद्य आदी व्यक्तींवरील लेखांचा समावेश आहे.


Comments

Top