सतीश सावरीकर, लातूर: शहरातील शिवाजीचौक पोलीस ठाणेच्या पाठभिंतीला हॉलीबॉल खेळाचे मैदान आहे. जुने जिल्हाधिकारी कार्यालय याच परिसरात आहे. जिल्हाधिकारी कार्यालय नवीन जागेत गेले असले तरी आणखी बरीच कार्यालये या भागात आजतागायत कार्यरत आहेत. कार्यालयांची वेळ संपल्यानंतर रात्रीच्यावेळी या ठीकाणी शुकशूकाट असतो. याचाच फायदा घेत कांही मद्द्यपी मंडळी जागोजागी मद्द्याच्या मैफीली रंगवत असल्याचे चित्र पहायला मिळते. सोबतच भलतेच लफडे देखील पहायला मिळतात. हे मद्द्यपी केवळ मद्द्य प्राशन करुन जात नाहीत तर पिऊन झाल्यावर बाटल्या मैदानावरच फोडून जातात. त्यामुळे बाटल्या आणि काचाचा खच जमा होतो. याचा त्रास सकाळी फिरायला येणार्या नागरिकांसह खेळाडूंना सहन करावा लागतो. विशेष म्हणजे हॉलीबॉल मैदानासाठी लातूर शहर महानगरपालिकेकडून शहरातल्या बर्याच प्रभागात मोठा खर्च करुन अनेक मान्यवरांच्या हस्ते मैदानांची उद्घाटनं पार पाडली. तर कांही प्रभागात मैदानाची डागडूजी करण्यात आली. मात्र शिवाजी चौक अर्थात जिल्हाधिकारी कार्यालयालयातील हॉलीबॉल मैदानाकडे महानगरपालिकेचे दूर्लक्ष होत आहे. किमान स्वच्छताही केली जात नाही. शिवाय पोलीस ठाण्याच्या अगदी पाठभिंतीला मद्द्याचा हा सर्व कार्यक्रम चालत असताना पोलिस सुद्धा लक्ष देत नाहीत. त्यामूळे खेळाडूंसह व्यायामासाठी आणि फिरायला येणार्या नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
Comments