लातूर : 'एनआयआयटी' च्या वतीने लातूर येथील दयानंद वाणिज्य महाविद्यालयात पार पडलेल्या कॅम्पस मुलाखतीत एकूण ६४ विद्यार्थ्यांची वरिष्ठ अधिकारी या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. दयानंद वाणिज्य महाविद्यालयाच्या इतिहासात प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांची कॅम्पस मुलाखतीद्वारे निवड करण्यात आली. दयानंद वाणिज्य महाविद्यालय आणि 'एनआयआयटी' यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच तीन दिवस या मुलाखती पार पडल्या. यात एकूण ६०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यामध्ये चार वेगवेगळ्या फेऱ्यांमधून ६४ विद्यार्थ्यांची आयसीआयसीआय बँकेत वरिष्ठ अधिकारी पदावर निवड झाली आहे. दयानंद वाणिज्य महाविद्यालयाच्या प्लेसमेंट सेलने यासाठी विशेष मेहनत घेतली. भरती अधिकारी म्हणून निरंजन मोहिते, अनुश्री जोशी यांनी काम पाहिले. वरिष्ठ अधिकारी पदावर निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी, उपाध्यक्ष रमेशकुमार राठी, सचिव रमेश बियाणी, संयुक्त सचिव सुरेश जैन यांनी अभिनंदन केले. यशस्वी विद्यार्थ्यांचा महाविद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी प्राचार्य डॉ. श्रीराम सोळंके, आयक्यूएसी समन्वयक डॉ.ब्रिजमोहन दायमा, डॉ. अंकुशकुमार चव्हाण, डॉ. बाळासाहेब चव्हाण, डॉ. मनीषा अष्टेकर, ग्रंथपाल प्रा. विठ्ठल जाधव, प्रा.शशिकांत स्वामी, प्रा. नंदकुमार पाटील यांची उपस्थिती होती. या मुलाखती यशस्वी करण्यासाठी प्लेसमेंट सेलचे प्रभारी प्रा. दगडू शेख, सदस्य प्रा. लक्ष्मीकांत सोनी, प्रा. लहू शेंडगे, प्रा. आकांक्षा भांजी, प्रा. सूरज बनसोडे, प्रा. अंकिता परांडेकर, प्रा. कल्याणी पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले. एवढ्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांची बँकेत निवड झाल्याबद्दल प्लेसमेंट सेलचे संस्था पदाधिकारी, प्राचार्य, सर्व प्राध्यापक आणि कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.
Comments